शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 14:26 IST

Maharashtra Assembly Election 2024 Dhananjay Munde : आपल्या राज्यातील महाविकास आघाडीही खोटे बोलून सत्तेत यायचा प्रयत्न करत आहे, अशी टीका कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

पारनेर - लाडकी बहीण योजनेवर महाविकास आघाडी टीका करते. त्यांचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणात महालक्ष्मी योजना आणणार असल्याचे खोटे सांगून सत्तेत आले. अशीच आपल्या राज्यातील महाविकास आघाडीही खोटे बोलून सत्तेत यायचा प्रयत्न करत आहे, अशी टीका कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. पारनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्या प्रचारार्थ सोमवारी निधीन येथील मळगंगा देवी प्रांगणात प्रचार समारोप सभेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, उमेदवार काशिनाथ दाते, माजी नगराध्यक्ष विजय औटी, विश्वनाथ कोरडे, मधुकर उचाले, राहुल शिंद सुनील थोरात, सचिन वराळ, प्रभाकर कवाद, वसंत चेडे, राजाराम एरंडे, विक्रम कळमकर, सुपमा रावडे, राजेंद्र उबाळे, सरपंच चित्रा करा भामार उचाले, उपसरपंच पंकाल कारखिले, उपसरपंच माउली वरखडे, बाबासाहेब खिलारी, गणेश शेळके, डॉ. भाऊसाहेब खिलारी, शिवाजी खिलारी, सोनाली सालके, शिवाजी चौधरी, वसंत मोरे, इंद्रभान गाडेकर, माऊली वराहे, सुभाष लोंढे, सरपंच लहू भालेकर, दत्ता आवारी, मनोज मुंगर्स, मिश्वराय मैथे, उत्तम गायकवाड, विलास हारदे, उमेश सोनवणे, बाळासाहेब लामखडे, रोहिदास लामखडे, आप्पासाहेब बोरुडे आदी उपस्थित होते.

पारनेरकरांशी माझे जुने नाते आहे. पारनेर कारखाना हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व माझ्या वडिलांची आठवण करून देणारा आहे. पारनेरकरांशी दुसरे नाते पारनेरकर महाराजांमुळे आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात कांदा, दूध, कापूस, सोयाबीन यामुळे शेतकरी नाराज होता. आम्ही केंद्र सरकारकडून निर्यात बंदी उठवली. भाव चांगला असून, विरोधक हे निवडणुकीपुरते आहेत, कांद्याचे भाव भविष्यात उतरणार नाहीत, अशी ग्वाही मुंडे यांनी दिली.

ग्रामपंचायत सदस्य सुधामती कवाद, विठ्ठल कवाद यांनी मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अपक्ष उमेदवार प्रवीण सुभाष दळवी, पतसंस्था ठेवीदार संघटना निघोज, ग्रामीण अल्पसंख्याक मंडळ, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, मुस्लिम संघटना, सावता माळी, जय मल्हार क्रांती संघटना प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी यावेळी उपस्थित होते.

जनता आमच्या सोबत : दाते 

काशिनाथ दाते म्हणाले, निघोज व परिसरातील जनता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहिली आहे. अपक्ष उमेदवार विजय औटी आमच्याबरोबर आहेत. भविष्यात कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. येथील लोकप्रतिनिधींनी राजकीय संस्कृती खराब केली आहे. माजी आमदार बाबासाहेब तुबे, वसंतराव झावरे, नंदकुमार झावरे, विजय औटी यांनी सुसंस्कृत राजकारण केले आहे. परंतु, आज अनेक लोक राजकीय दबावाखाली आहेत. तरीही ते आम्हाला मदत करणार आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४parner-acपारनेरDhananjay Mundeधनंजय मुंडेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी