शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रुपयांचे साहित्य गोदामात पडून

By admin | Updated: April 2, 2016 00:35 IST

ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर जिल्हा परिषदेत वैयक्तिक लाभाच्या योजनाची अंमलबजावणी आणि विविध खरेदीवरून वादंग सुरू आहे.

ज्ञानेश दुधाडे, अहमदनगरजिल्हा परिषदेत वैयक्तिक लाभाच्या योजनाची अंमलबजावणी आणि विविध खरेदीवरून वादंग सुरू आहे. मात्र, दुसरीकडे प्रशासनाने तालुकास्तवर केलेल्या गोदाम तपासणीत लाखो रुपयांचे साहित्य धूळखात पडून आहे. या साहित्यात कडबाकु ट्टी, झेरॉक्स मशीन, पिको फॉल मशीन, मुला-मुलींच्या सायकल, वीजेवर चालणारी पाण्याची मोटार, पीव्हीसी पाईप, पत्रे, पाईप फवारणी पंप यासह अन्य साहित्याचा समावेश आहे. लाभार्थ्यांकडून मागणी नसतांना कशासाठी या साहित्याची खरेदी झाली? हा संशोधनाचा विषय ठरणार आहे. वर्षानुवर्षे साहित्य पडून असताना प्रशासन काय करतेय हाही प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेत समाज कल्याणसह अन्य विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनाची अंमलबाजवणी आणि विविध खरेदीवरून वादंग सुरू आहे. आर्थिक वर्ष संपत असतांना प्रशासनाने आणि विविध विभागाकडून जाणिवपूर्वक वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या खरेदीची प्रक्रिया लांबवण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. स्थायी समिती, सर्वसाधारण सभेतही हा विषय गाजलेला आहे. मात्र, या पूर्वी राबवण्यात आलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची स्थिती आणि तालुकास्तवरावर शिल्लक असणाऱ्या साहित्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न प्रशासानाने केला. २०१२-१३ पासून अनेक विभागाचे साहित्य गोदाम धूळखात पडून आहे. समाज कल्याण आणि कृषी विभागासह अन्य वैयक्तिक लाभ देणाऱ्या विभागातील साहित्याचा समावेश आहे. जिल्हा परिषदेत काही महिन्यांपासून या विषयांवरून चांगलेच रणकंदन सुरू आहे. प्रशासनाने तालुकास्तरावर केलेल्या गोदाम तपासणीत तालुकास्तरावरून शिल्लक असणाऱ्या साहित्याची विभागनिहाय आकडेवारी पाठवण्यात आलेली आहे. यात संबंधित साहित्य लाभार्थ्यांपर्यंत का पोहचले नाही, याबाबत विचारणा केली असता, अनेक ठिकाणी संबंधित साहित्याला मागणी नाही, बाजारभावापेक्षा जि.प.च्या साहित्याचा दर अधिक आहे, २०१२ पासून आजपर्यंत वाटप सुरू आहे, आदी शेरा तालुकास्तरावरून पाठवण्यात आलेला आहे. प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी १५ एप्रिलपर्यंत हे साहित्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे आदेश दिले आहेत.