शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

वंचितांना विधानसभा, संसद पाहू द्या : लक्ष्मण माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 11:11 IST

वंचित समाज घटकांना आजपर्यंत विधानसभा, संसद बघायला मिळालेली नाही. या घटकांनाही संसद बघू द्या, असे आवाहन करत यापुढे कुणीही बहुजन समाजाला गृहीत धरु नये, असा इशारा ‘उपरा’कार व माजी आमदार लक्ष्मण माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दोन्ही कॉंग्रेस व भाजपला दिला.

ठळक मुद्देजनतेसाठी पैसा नाही म्हणता तर खुर्ची सोडा; आम्ही पैसे उभे करतो

अहमदनगर : वंचित समाज घटकांना आजपर्यंत विधानसभा, संसद बघायला मिळालेली नाही. या घटकांनाही संसद बघू द्या, असे आवाहन करत यापुढे कुणीही बहुजन समाजाला गृहीत धरु नये, असा इशारा ‘उपरा’कार व माजी आमदार लक्ष्मण माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दोन्ही कॉंग्रेस व भाजपला दिला. वंचित बहुजन आघाडी लोकसभा व विधानसभा लढविणार असल्याचेही ते म्हणाले.नगर येथे आले असता माने यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. प्रा. किसन चव्हाण यावेळी त्यांच्यासमवेत होते. माने यांनी संपादकीय टीमशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘भाजप सरकार जनतेची मुस्कटदाबी करत आहे. मोदी देशाला आपली खासगी मालमत्ता समजत आहेत. देश पूर्णत: भांडवलदारांच्या ताब्यात दिला गेला आहे. त्यामुळे बेरोजगाची प्रचंड वाढली आहे. तरुण वर्ग उद्या कोणते टोक गाठेल हे काहीही सांगता येत नाही.देशाची ही जी अवस्था आहे त्यास कॉंग्रेस व राष्टÑवादीही तेवढीच जबाबदार आहे. या पक्षांनीही भांडवलशाही पोसली. हे आज भाजपवर आरोप करतात. पण, आजवर यांचे कुणी हात बांधले होते?वेगवेगळे समाजबांधव आज आरक्षणाची मागणी करत आहेत. आजपर्यंत ज्या समाजघटकांना आरक्षण देण्यात आले त्यांचीही फसवणूकच झालेली आहे. राजकारणासाठी आरक्षणाच्या मुद्याचा फायदा उठविला जात आहे. नोकर भरतीच निघणार नसेल तर आरक्षणाचे काय करायचे? फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र, नोकर भरती करणार आहे का? हे सरकारने जाहीर करावे. अन्यथा या समाजाचीही फसवणूकच होईल. जिल्हाधिकारी होण्यासाठी आयएएस होण्याची गरज नाही, असे कार्पोरेट धोरण मोदी सरकार राबवित आहे. बहुजन व गरिबांची मुले आता ‘आयएएस’ होऊ नये यासाठी हे षडयंत्र आहे. भाजपला थोपविण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आहे. आमची सत्ता आल्यास आरक्षण देण्याची गरज भासणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करू. मुख्यमंत्री हे सरकारकडे पैसा नसल्याचे सांगतात. आम्ही म्हणतो, पैसा नाही म्हणता तर मग खुर्ची सोडा. पैसा कोणाकडून उभा करायचा ते आम्ही सांगतो.बुद्धिवंतांना नक्षलवादी ठरविण्याचा प्रयत्ननक्षलवाद्यांशी संबंध जोडून बुद्धिवंतांना अटक केली जात आहे. ज्यांना अटक केली ती पुस्तके लिहिणारी, निरुपद्रवी माणसं आहेत. गरिबांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. कोणत्याही राजकीय पक्षांशी ते बांधील नाहीत. त्यांनाच नक्षलवादी ठरविण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून पोलिसांनी मानवी हक्क चळवळीतील कार्यकर्ते, साहित्यिक, विधिज्ञ, पत्रकार यांना मंगळवारी अटक केली. या पार्श्वभूमीवर माने म्हणाले, सरकारने लष्कराला बोलावून थेट नक्षलवाद्यांना गोळ््या घालाव्यात. पण, बुद्धिवंतांवर खोटे गुन्हे दाखल करु नयेत. संभाजी भिडेला अटक होत नाही. मात्र, बुद्धिवंतांना होते. सनातन, राष्टÑीय स्वयंसेवक संघ यांची कोठेही नोंदणी नसताना या संस्था चालतात कशा?...तर काँग्रेसही आम्हाला नकोवंचित बहुजन आघाडीला राज्यात लोकसभेच्या १२ जागा द्याव्यात असा प्रस्ताव आम्ही दोन्ही कॉंग्रेससमोर ठेवला आहे. मात्र, त्यांच्याकडून उत्तर आलेले नाही. एवढ्या जागा आम्हाला ‘अ‍ॅडजस्ट’ करता येणार नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे आहे. ते जर आम्हाला समायोजित करु इच्छित नसतील, तर यापुढे आमचीही कॉंग्रेसला ‘अ‍ॅडजस्ट’ करण्याची भूमिका नाही, असे माने म्हणाले. यांनाच मते देण्याची आमची मानसिकता नाही. आता वंचितांनाही संसदेत पोहचण्याचे वेध लागले आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना