बिबट्याच्या हल्ल्यात उस तोडणी मजूर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 14:37 IST2020-12-02T14:36:25+5:302020-12-02T14:37:34+5:30
बिबट्याच्या हल्ल्यात उस तोडणी मजूर जखमी झाला आहे. मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आश्वी परिसरातील प्रतापूर रस्त्यावर दत्त मंदिराजवळ घटना घडली.

बिबट्याच्या हल्ल्यात उस तोडणी मजूर जखमी
आश्वी : बिबट्याच्या हल्ल्यात उस तोडणी मजूर जखमी झाला आहे. मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आश्वी परिसरातील प्रतापूर रस्त्यावर दत्त मंदिराजवळ घटना घडली.
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे उस तोडणी मजूर सचिन मदन राठोड (वय २२) व त्याचे दोन सहकारी मोटारसायकलवर आश्वीकडे येत होते. दत्त मंदिर परिसरात भक्ष्याच्या शोधात रस्त्यालगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मोटारसायकलवर झेप घेतली. यावेळी दोघे सावध असल्यामुळे बिबट्याचा हल्ला परतवून लावला. यात मदन राठोड यांच्या पायावर बिबट्याने पंजा मारल्यामुळे जखम झाली आहे. यावेळी राठोड व त्यांच्या सहकार्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण आहे.