... या नेत्याने केला पुनरूच्चार.. राज्यात लवकरच भाजपची सता येईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 13:02 IST2020-11-20T13:01:57+5:302020-11-20T13:02:56+5:30
बिहार निवडणुकीच्या यशानंतर राज्यातही आपली जबाबदारी वाढली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन आत्मनिर्भर योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा. राज्यात लवकरच भाजपची सता येईल. शिर्डी नगरपंचायतीवरही भाजपचाच झेंडा फडकविण्यासाठी सज्ज रहा, असे आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.

... या नेत्याने केला पुनरूच्चार.. राज्यात लवकरच भाजपची सता येईल
शिर्डी : बिहार निवडणुकीच्या यशानंतर राज्यातही आपली जबाबदारी वाढली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन आत्मनिर्भर योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा. राज्यात लवकरच भाजपची सता येईल. शिर्डी नगरपंचायतीवरही भाजपचाच झेंडा फडकविण्यासाठी सज्ज रहा, असे आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
शिर्डी शहरातील भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांना विखे यांच्या हस्ते बुधवारी नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी विखे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. अनेक महिने घरात बसलेले मुख्यमंत्री राज्याने कधी पाहिले नव्हते. शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. समाजातील कोणत्याच घटकांना आघाडी सरकार दिलासा देऊ शकले नाही.
महाविकास आघाडी सरकारचे अपयश जनतेला सांगावे लागेल. आगामी काळात नगरपंचायतीची निवडणूक लक्षात घेऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नियोजन सुरू करावे. थोड्याच दिवसात राज्यात सता येईल आणि नगरपंचायतीवरही भाजपाचा झेंडा फडकेल, असे सूतोवाच विखे यांनी केले.