कोपरगाव : शहरासह तालुक्यात बुधवारी (दि.२४ ) ९४ बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असून बाधित रुग्णांची संख्या ४२१ इतकी झाली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}बुधवारी रॅपिड अँटिजेन तपासणीत १७ व खासगी लॅब अहवालात ३७ तर नगर येथील अहवालात ४० असे एकूण ९४ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधित रुग्णांचा आकडा ४२१ वर गेला असून दिवसागणिक होणारी रुग्णवाढ कोपरगावकरांसाठी चिंता वाढविणारी ठरत आहे. ९६ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविले आहे. तर ६५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.