कोल्हारच्या महाविद्यालयीन तरुणाची संगमनेरजवळ आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 16:23 IST2020-01-17T16:22:22+5:302020-01-17T16:23:21+5:30
कोल्हार महाविद्यालयात दुस-या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांने संगमनेर जवळील दुधेश्वर मंदिर परिसरातील ओसाड जागेत झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. दत्तात्रय चंद्रहंस लोंढे (वय १९, रा.कोल्हार खुर्द, ता.राहुरी) असे मृत युवकाचे नाव आहे.

कोल्हारच्या महाविद्यालयीन तरुणाची संगमनेरजवळ आत्महत्या
कोल्हार : कोल्हार महाविद्यालयात दुस-या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांने संगमनेर जवळील दुधेश्वर मंदिर परिसरातील ओसाड जागेत झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. दत्तात्रय चंद्रहंस लोंढे (वय १९, रा.कोल्हार खुर्द, ता.राहुरी) असे मृत युवकाचे नाव आहे.
मयत दत्तात्रय प्रवरा शिक्षण संस्थेच्या कोल्हार येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. गुरुवारी सकाळी मयत दत्तात्रय हा महाविद्यालयात हजर होता. सुटीनंतर दत्तात्रय हा आपली मोटारसायकल घेऊन लोणी-संगमनेरजवळ असलेल्या दुधेश्वर महादेव मंदिराजवळील ओसाड जागेत गेला. तेथे त्याने महाविद्यालयीन ड्रेसचा शर्ट व स्वेटर गळ्याभोवती आवळत झाडाला बांधून गळफास घेतला. मयत दत्तात्रय हा एकुलता एक मुलगा होता. याबाबत आश्वी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे निश्चित कारण मात्र समजू शकले नाही.