केबीसीचा संगमनेरकरांना ५० कोटींचा गंडा
By Admin | Updated: July 19, 2014 00:36 IST2014-07-18T23:23:16+5:302014-07-19T00:36:14+5:30
आश्वी : संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेल्या के.बी.सी. मल्टीट्रेड कंपनीत संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमधून सुमारे ५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणात आल्याचे ग्रामस्थांमधून सांगण्यात येत आहे़

केबीसीचा संगमनेरकरांना ५० कोटींचा गंडा
आश्वी : संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेल्या के.बी.सी. मल्टीट्रेड कंपनीत संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमधून सुमारे ५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणात आल्याचे ग्रामस्थांमधून सांगण्यात येत आहे़ त्यामुळे ग्रामस्थांची मोठी फसवणूक झाली असून, सबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
के़बी़सी़ कंपनीच्या भूलथापांना बळी पडून पूर्व भागातील कनोली, जोर्वे, खराडी, रहीमपूर, ओझर, हंगेवाडी, चणेगाव, कनकापूर आदी गावांमधील नागरिकांनी पैसे भरले आहेत. पैशाच्या अमिषापोटी एकट्या कनोली गावातील ९७ टक्के लोकांनी सुमारे ३० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. दिलेले पैसे परत मिळत नसल्याने कंपनीने गंडविल्याचे लक्षात येताच तिघा जणांनी आत्महत्या केली. हे वृत्त समजताच कनोली गावातील गुंतवणूकदार पुढे आले. ज्ञानदेव वर्पे, गौतम जगताप, मिनानाथ वर्पे, राधाकिसन काकड आदींसह ५० गुंतवणूकदारांनी संबंधीत कंपनीच्या संचालकाविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल करुन पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली.
(वार्ताहर)