शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत- जामखेडमध्ये पवार विरुद्ध शिंदे यांच्यात सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:17 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत कर्जत- जामखेडची लढत लक्ष्यवेधी ठरली होती. भाजपचे माजी मंत्री राम शिंदे व राष्ट्रवादीचे आ. रोहित ...

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत कर्जत- जामखेडची लढत लक्ष्यवेधी ठरली होती. भाजपचे माजी मंत्री राम शिंदे व राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांच्यात निवडणुकीनंतरही संघर्ष कायम आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. मतदारसंघातील या दोन्ही तालुक्यांत पुन्हा वर्चस्व निर्माण करण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे, तर अधिकाधिक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी पवार सरसावले आहेत. त्यामुळे कर्जत- जामखेडमध्ये पवार विरुद्ध शिंदे असा सामना पाहायला मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच जिल्ह्यात ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. विधानसभा निवडणुकीत अकोले, कोपरगाव, राहुरी, नेवासा, श्रीगोंदा आणि कर्जत- जामखेड तालुक्यांत सत्तांतर झाले. कर्जत- जामखेडमधील निवडणूक लक्ष्यवेधी ठरली. कर्जत- जामखेड तालुक्यातून शिंदे यांची पीछेहाट झाली. दोन्ही तालुक्यांवर ग्रामपंचायत निवडणुकांच्या माध्यमातून पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी शिंदे यांची माेर्चे बांधणी सुरू आहे. राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे अधिकाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी आग्रही आहेत. अकोले तालुक्यात राष्ट्रवादीचे आ. डॉ. किरण लहामटे व भाजपचे माजी आ. वैभव पिचड यांच्यात लढत रंगणार आहे. विधानसभा निवडणुकीत पिचड यांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला. तालुक्यावर पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका ही एक नामी संधी आहे. आ. लहामटे हेही ग्रामपंचायत निवडणुकांवर लक्ष्य ठेवून आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त अकोले तालुक्यात पुन्हा एकदा दोन नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील.

कोपरगाव हा तालुका काळे व कोल्हे कुटुंबांतील सत्ता संघर्षामुळे नेहमीच चर्चेत असतो. विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे कोल्हे कुटुंबाचे तालुक्यातील वर्चस्व कमी झाले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यावरील वर्चस्व सिद्ध करण्याचा कोल्हे यांचा प्रयत्न असणार आहे. राष्ट्रवादीचे आ. अशुतोष काळे हेदेखील गावोगावच्या कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून आहेत. या तालुक्यात माजी मंत्री तथा आ. राधाकृष्ण विखे यांचे मेव्हणे जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यात काळे, कोल्हे आणि परजणे यांच्यातील सुप्त संघर्ष यानिमित्ताने पाहायला मिळेल, असे बोलले जाते. नेवासा तालुक्यात भाजपचे माजी आ. बाळासाहेब मुरकुटे हे ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय झाले आहेत. सेनेचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व त्यांचे बंधू प्रशांत गडाख यांचा गावागावात थेट संपर्क आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यात गडाख बंधू की मुरकुटे, कुणाचा करिश्मा चालणार, याची उत्सुकता आहे. शेवगाव- पाथर्डी तालुक्यात भाजपच्या आ. मोनिका राजळे यांच्याशी चर्चा करून निवडणुकांची रणनीती आखली जात आहे. या दोन्ही तालुक्यांतील वर्चस्व कायम ठेवण्याचा राजळे यांचा प्रयत्न आहे. पाथर्डी तालुक्यात राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे, तर शेवगाव तालुक्यात माजी आ. चंद्रशेखर घुले हे अधिकाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले यांचा तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद घुले यांच्याकडेच असल्याने शेवगाव तालुक्यात घुले यांनी पुन्हा पकड निर्माण केली आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यादेखील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून शेवगाव तालुक्यावरील पकड घट्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे शेवगाव तालुक्यात काकडे, घुले आणि राजळे यांच्यात लढत होईल, असे बोलले जाते. श्रीगोंदा तालुक्यात माजी आ. राहुल जगताप हे गावोगावी फिरताना दिसतात. त्यांचा तालुक्यात जनसंपर्क आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांचा पराभव झाला. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी जगताप हे तालुक्यात पुन्हा सक्रिय झाले आहेत. भाजपचे आ. बबनराव पाचपुते यांनी विधानसभा जिंकून तालुक्यावरील वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात वर्चस्व कुणाचे पाचपुतेंचे की जगतापांचे, हे ग्रामपंचायत निवडणुकीतून समोर येईल.

....

पारनेर तालुक्यात औटी- लंके यांच्यात संघर्ष

पारनेर तालुक्यातील सेनेचे माजी आ. विजय औटी यांचा राष्ट्रवादीचे आ. नीलेश लंके यांनी विधानसभा निवडणुकीत पराभव केला. मात्र, सत्ता स्थापनेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक पातळीवर सेनेशी जुळवून घेण्याच्या सूचना केल्या आहेत; परंतु पारनेर तालुक्यात लंके व औटी यांचा संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यामुळे या तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये औटी व लंके यांच्यात समझोता होणार की पुन्हा संघर्ष पाहायला मिळणार, याची उत्सुकता आहे.

...

राहुरी- नगर तालुक्यांत कर्डिले विरुद्ध महाविकास आघाडी

राहुरी- नगर तालुक्याचे भाजपचे माजी आ. शिवाजीराव कर्डिले हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. राष्ट्रवादीचे प्रजाक्त तनपुरे यांनी कर्डिलेंचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कर्डिले यांच्याविरोधात तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडी केली आहे; परंतु कर्डिले हे स्वत: गावागावात फिरून मंडळांना ताकद देत आहेत. राहुरी तालुक्यातही कर्डिले यांचा दांडगा जनसंपर्क आहे. नगर तालुक्यात महाविकास आघाडीला थोपविण्याचे कर्डिले यांच्यासमोर आव्हान आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका लक्ष्यवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.