कर्जत हा दोन उपजिल्हा रुग्णालये असणारा राज्यातील पहिला मतदारसंघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:25 IST2021-08-27T04:25:08+5:302021-08-27T04:25:08+5:30
तालुक्यातील फक्राबाद येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, पंचायत ...

कर्जत हा दोन उपजिल्हा रुग्णालये असणारा राज्यातील पहिला मतदारसंघ
तालुक्यातील फक्राबाद येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, पंचायत समिती सभापती सूर्यकांत मोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कर्जत-जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, तालुका युवक अध्यक्ष शरद शिंदे, ठेकेदार राहुल पुरी, नगरसेवक अमित जाधव, हळगावचे सरपंच किसनराव ढवळे, नरेंद्र जाधव, ऊमर कुरेशी, शेख, झुबेर शेख, नीलेश पवार, फक्राबादचे सरपंच विश्वनाथ राऊत आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, शासन व डॉ. आरोळे हॉस्पिटल यांच्या माध्यमातून ११ हजार रुग्ण कोरोनामुक्त केले. कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात विकासकामांना खिळ बसली असली तरी सातत्याने पाठपुरावा करून २० कोटी पेक्षा जास्त निधी विकासाकामांसाठी आणला आहे. फक्राबाद येथे होणाऱ्या आरोग्य उपकेंद्रामुळे पंचक्रोशीतील दहा ते बारा गावांना फायदा होईल.
प्रास्ताविकात फक्राबादचे सरपंच राऊत म्हणाले, मागील दहा वर्षांपासून आरोग्य केंद्र व्हावे म्हणून प्रयत्न करीत होतो. पाच वर्षे मंत्रीपदावर असणाऱ्यांनी केवळ नादी लावले. विधानसभा निवडणुकीत आ. रोहित पवार यांच्याकडून शब्द घेतला होता. त्याची पूर्तता त्यांनी आज केली. आभार जालिंदर राऊत यांनी मानले.
-----------
फोटो - २६ रुग्णालय
फक्राबाद येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन आ. रोहित पवार यांनी केले. यावेळी सभापती सूर्यकांत मोरे, दत्तात्रय वारे, प्रा. मधुकर राळेभात, शरद शिंदे, विश्वनाथ राऊत आदी.