के. एच.बगाटे साईसंस्थानचे नवे सीईओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 18:45 IST2020-08-10T18:43:30+5:302020-08-10T18:45:43+5:30

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राज्य शासनाने सोमवारी (१० आॅगस्ट) के. एच. बगाटे यांची नियुक्ती केली आहे. साईसंस्थानचे चौथे सीईओ म्हणून बगाटे हे मंगळवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर पदभार स्वीकारणार आहेत.

K. H. The new CEO of Bagate Sai Sansthan | के. एच.बगाटे साईसंस्थानचे नवे सीईओ

के. एच.बगाटे साईसंस्थानचे नवे सीईओ

शिर्डी : साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राज्य शासनाने सोमवारी (१० आॅगस्ट) के. एच. बगाटे यांची नियुक्ती केली आहे. साईसंस्थानचे चौथे सीईओ म्हणून बगाटे हे मंगळवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर पदभार स्वीकारणार आहेत.

    कान्हुराज बगाटे यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी या पदावरून सोमवारी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. यापूर्वी गेल्या डिसेंबर महिन्यातच त्यांची रत्नागिरीला बदली झाली होती. पंधरा दिवसापूर्वी त्यांची तेथून बदली झाली होती. त्यानंतर ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.

 यापूर्वी बगाटे यांनी नंदूरबार जिल्ह्यात सरदार सरोवर प्रकल्पात अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरही काम केलेले आहे. याशिवाय नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. 

गेल्या २३ जुलै रोजी अरुण डोंगरे यांची मुंबईला म्हाडामध्ये बदली झाली आहे. या पदावर सध्या संस्थानचे डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे यांच्याकडे पदभार आहे. 
 

Web Title: K. H. The new CEO of Bagate Sai Sansthan