के. के.रेंजसंदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीत घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट; तोडगा काढण्याचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 14:58 IST2020-08-12T14:56:45+5:302020-08-12T14:58:53+5:30

नगर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील २३ गावातील हजारो शेतक-यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्न असलेल्या के.के. रेंजसंदर्भात नवी दिल्ली येथे बुधवारी (१२ आॅगस्ट)  संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची नगर जिल्ह्यातील भाजप शिष्टमंडळाने खासदार डॉ.सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. संरक्षणमंत्र्यांनी राज्य सरकारशी समन्वय साधत या प्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले आहे.

K. BJP delegation meets Defense Minister in Delhi regarding K-Range; Promise to settle | के. के.रेंजसंदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीत घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट; तोडगा काढण्याचे आश्वासन

के. के.रेंजसंदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीत घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट; तोडगा काढण्याचे आश्वासन

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील २३ गावातील हजारो शेतक-यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्न असलेल्या के.के. रेंजसंदर्भात नवी दिल्ली येथे बुधवारी (१२ आॅगस्ट)  संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची नगर जिल्ह्यातील भाजप शिष्टमंडळाने खासदार डॉ.सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. संरक्षणमंत्र्यांनी राज्य सरकारशी समन्वय साधत या प्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले आहे.

यावेळी  माजी आमदार  शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुजित झावरे, राहुल शिंदे हे उपस्थित होते.

 दोनच दिवसांपूर्वी नगर, राहुरी व पारनेर तालुक्यातील काही गावांमध्ये सैन्य दलातील अधिकाºयांनी केलेल्या पाहणीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिष्टमंडळाने ही भेट  घेतली आहे. लष्करी अधिकाºयांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे अस्वस्थ झालेल्या हजारो शेतकºयांच्या भावना भारत सरकारचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या कानावर घातल्या. 

Web Title: K. BJP delegation meets Defense Minister in Delhi regarding K-Range; Promise to settle