शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

फक्त १३ दिवस....दमछाक निश्चित

By admin | Updated: April 22, 2024 11:35 IST

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना फक्त १३ दिवसांचाच अवधी मिळणार असल्याने कमीतकमी वेळेत जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान त्यांच्यापुढे उभे ठाकणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना फक्त १३ दिवसांचाच अवधी मिळणार असल्याने कमीतकमी वेळेत जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान त्यांच्यापुढे उभे ठाकणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २० सप्टेंबरला निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे. २७ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. १ आॅक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. १५ आॅक्टोबरला मतदान आहे. निवडणुकीचे हे वेळापत्रक लक्षात घेतले तर फक्त १३ दिवसच उमेदवारांना त्यांच्या प्रचारासाठी मिळतात. मतदारसंघाची व्याप्ती आणि मतदारांची संख्या लक्षात घेतली तर इतक्या कमी वेळेत त्यांच्यापर्यंत पोहोचणे उमेदवारांसाठी अवघड काम आहे. अद्याप आघाडी आणि युतीचे जागा वाटपच झाले नाही. उमेदवार निवडही व्हायचीच आहे. ते झाल्यानंतर प्रचारात रंगत येणार आहे. विशेष म्हणजे प्रचाराचा काळ हा नवरात्रोत्सवाचा आहे. त्यामुळे मतदारही उमेदवारांना कितपत मिळू शकतील हा प्रश्नच आहे. प्रत्येक मतदारसंघातील गल्लीबोळात नवरात्र महोत्सव साजरा केला जातो. त्यात त्या भागातील युवक सहभागी होतात. अशा वेळी प्रचार यात्रा किंवा प्रचार मिरवणुका काढल्या तरी त्याला मतदारांचा आणि त्या भागातील युवकांचा किती सहभाग मिळू शकतो हा प्रश्नच आहे. त्यामुळे सोशल मीडियाचाच जास्तीतजास्त वापर उमेदवारांना करावा लागणार आहे. नवरात्र महोत्सवात आचारसंहितेमुळे थेट सहभाग नोंदवता येणार नसला तरी आर्थिक पाठबळ मंडळाच्या मागे उभे करून उमेदवार संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांचा प्रचारासाठी उपयोग करून घेऊ शकतो.दसऱ्याच्याच दरम्यान किंवा दिवाळीच्या आधी शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा घेतल्या जातात. दिवाळीच्या आधी महाविद्यालयांना सुट्या लागतात. त्या काळात अनेक कुटुंब बाहेरगावी जातात. याचाही फटका प्रचाराला बसू शकतो. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका आहेत. त्यामुळे राज्यस्तरावरील किंवा केंद्रस्तरावरील स्टार प्रचारकांचे निवडणूक दौैरे आयोजित करणेही कठीण होणार आहे. दोन टप्प्यात निवडणुका झाल्या असत्या तर त्यानुसार नियोजन करणे सोपे जाते. मात्र एकाच वेळी संपूर्ण राज्यात नेत्यांना प्रचारासाठी फिरावे लागणार आहे. केंद्रीय नेत्यांचीही या कामात कसोटी लागणार आहे.