पारनेर तालुक्यात रुग्णांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:15 IST2021-07-08T04:15:37+5:302021-07-08T04:15:37+5:30

अहमदनगर : पारनेर तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे. रोज सरासरी ६० रुग्ण आढळून येत आहेत. पारनेर तालुक्यात ...

Increase in the number of patients in Parner taluka | पारनेर तालुक्यात रुग्णांच्या संख्येत वाढ

पारनेर तालुक्यात रुग्णांच्या संख्येत वाढ

अहमदनगर : पारनेर तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे. रोज सरासरी ६० रुग्ण आढळून येत आहेत. पारनेर तालुक्यात मुंबई येथून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय आणखी काही कारणे असतील तर त्याचा शोध घेतला जाणार आहे. पारनेर तालुक्यात वाढणाऱ्या रुग्णसंख्येबाबत बुधवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही चिंता व्यक्त करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात ४२९ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात बुधवारी ३३३ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार ३६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९६ टक्के इतके झाले आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ६३५ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९८ आणि अँटिजन चाचणीत २२३ जण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर १, नगर ग्रामीण ३, पारनेर १, श्रीगोंदा १ आणि श्रीरामपूर २ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर ३, अकोले ७, जामखेड ४, कर्जत ८, नगर ग्रामीण ७, नेवासा १९, पारनेर ३५, पाथर्डी २४, राहता १३, राहुरी १, संगमनेर ३०, शेवगाव १०, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर ९ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजन चाचणीत २२३ जण बाधित आढळीन आले. नगर शहर २, अकोले २१, जामखेड ३६, कर्जत २१, कोपरगाव १३, नगर ग्रामीण १९, नेवासा ७, पारनेर २५, पाथर्डी ६, राहाता २, राहुरी १७, संगमनेर १४, शेवगाव १०, श्रीगोंदा १७, श्रीरामपूर ९ आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

-----------

मृत्यूच्या संख्येत १४०० रुग्णांची तफावत

जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या संख्येत १४०० मृत्यूची तफावत आढळ‌ून आली होती. अनेक खासगी रुग्णालयांना मृत्यूची आकडेवारी पोर्टलवर अपलोड करण्याबाबत अडचणी आल्या. याबाबत असणारे पासवर्ड त्यांनी घेतले नाहीत. सदरची आकडेवारी जून महिन्यात दाखल करण्यात आली. कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे डेथ ऑ़डिटही पूर्ण झाले आहे, मात्र त्यामध्ये वेगळे काही आढळून आले नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी दिली.

----

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्णसंख्या : २,७४,३६२

उपचार सुरू असलेले रुग्ण : २,६३५

पोर्टलवरील मृत्यू नोंद : ५,९६०

एकूण रुग्णसंख्या : २,८२,९५७

Web Title: Increase in the number of patients in Parner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.