डागी मंत्र्यांना तातडीने बडतर्फ करा; भाजपच्या माजीमंत्र्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 17:24 IST2021-02-15T17:23:03+5:302021-02-15T17:24:07+5:30
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर सरकारने अद्याप गुन्हाच दाखल केलेला नाही. मग सत्य बाहेर कसे येणार? असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. या प्रकरणात गुंतलेल्या डागी मंत्र्याना तातडीने बडतर्फ करा, अशी मागणीही त्यांनी केली.

डागी मंत्र्यांना तातडीने बडतर्फ करा; भाजपच्या माजीमंत्र्यांची मागणी
संगमनेर : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर सरकारने अद्याप गुन्हाच दाखल केलेला नाही. मग सत्य बाहेर कसे येणार? असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. या प्रकरणात गुंतलेल्या डागी मंत्र्याना तातडीने बडतर्फ करा, अशी मागणीही त्यांनी केली.
आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरला सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. पूजा चव्हाण आत्महत्येवर परखड भाष्य करुन, महाविकास आघाडी सरकारवर टिका केला. या घटनेचे गांभिर्य सरकारने अद्यापही दाखविलेले नाही. घटनेत गुंतलेले मंत्री अजुनही गायब असल्याकडे लक्ष वेधून, या घटनेतील सत्यता समोर यावी असे मुख्यमंत्र्यांसहीत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना वाटत असेल तर, अद्याप गुन्हा दाखल का झाला नाही, मग कशी सत्यता बाहेर येणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मागील वेळी सुध्दा मंत्रीमंडळातील राष्ट्रवादीचे मंत्री अशाच घटनेमध्ये अडकल्यानंतर काय झाले हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार आहे हाच संदेश राज्यात जातोय याचे भान महाविकास आघाडी सरकारने ठेवले, असे विखे यांनी स्पष्ट केली.