शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

हालचालीच्या तंत्रामुळेच मूर्ती जीवंत!

By admin | Updated: September 7, 2016 00:37 IST

सुदाम देशमुख , अहमदनगर अहमदनगर : मूर्ती तयार करणारे अनेक शिल्पकार आहेत. मात्र हालचालीच्या माध्यमातून मूर्ती जीवंत करण्याचे तंत्रज्ञान हे सर्वांनाच जमते असे नाही.

सुदाम देशमुख , अहमदनगरअहमदनगर : मूर्ती तयार करणारे अनेक शिल्पकार आहेत. मात्र हालचालीच्या माध्यमातून मूर्ती जीवंत करण्याचे तंत्रज्ञान हे सर्वांनाच जमते असे नाही. मूर्ती जीवंत करण्यासाठी वर्षभर परिश्रम घ्यावे लागतात. गणेशोत्सवात एकाचवेळी अनेक ठिकाणी देखावे तयार करण्याची एक स्वतंत्र इंडस्ट्री आहे. मुंबई आणि परप्रांतातील कारागीर देखावे तयार करण्यासाठी खास नगरमध्ये तळ ठोकून आहेत. या उद्योगातून लाखो रुपयांचे उत्पन्न त्यांना नगरमधून मिळते आहे. कोणत्या गावचा गणेशोत्सव किती चांगला आहे, याचा मापदंड हा त्या गावामध्ये असलेल्या देखाव्यांवरूनच ठरतो. डिजे, आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मिडियाचा कितीही प्रभाव असला तरी गणेशोत्सवातील देखाव्यांचे महत्त्व अद्यापही टिकून आहे. पूर्वी साध्या तंत्राद्वारे हालते देखावे तयार केले जायचे. दोरीच्या सहाय्याने किंवा हातामध्ये दोरी धरून एखादी व्यक्ती पडद्यामागे राहून मूर्ती हालती ठेवली जायची. त्या तंत्रामध्ये बदल होत आता स्वयंचलित हालत्या मूर्ती या आकर्षण ठरत आहेत. नगरमधील पटवर्धन चौकातील शिववरद प्रतिष्ठानने ‘कृष्णाने करंगळीवर उचललेला गोवर्धन पर्वत’ हा भव्य देखावा साकारला आहे. हा देखावा तयार करणारे मूर्तीकार महेंद्र पंधारे हे अंबरनाथ येथून आले आहेत. गत २५ वर्षांपासून त्यांचे व नगरच्या गणेशोत्सवाशी नाते जुळले आहे. त्यांचा अंबरनाथ येथेच मूर्ती तयार करण्याचा कारखाना आहे. फायबरच्या मूर्ती तयार करण्यात वर्षभर ते व्यस्त असतात. सहा महिन्यांपासूनच देखावे तयार करण्याची आॅर्डर सुरू होते. आयोजकांच्या संकल्पनेप्रमाणे कथानक तयार करून एखाद्या देखाव्यामध्ये किर्ती मूर्ती असाव्यात, हे निश्चित केले जाते. देखाव्यामध्ये किती मूर्ती वापरणार आहेत, यावरूच देखावा तयार करणे आणि तो अ‍ॅक्टीव्ह करणे या कामाचे भाडे ठरले जाते. मूर्तीमधील हालचाली करण्याचे एक विशिष्ट तंत्र आहे. वीजेवर चालणारी मोटार वापरून मूर्तीची पाहिजे तशी हालचाल करून घेतली जाते.