शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

शेततळ्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू, वर्षापूर्वीच झालं होतं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 13:03 IST

वीजपुरवठा सुरू नसल्याने पूजा व तिचा पती नीलेश हे पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेले होते. याच दरम्यान पाणी भरताना पाय घसरून नीलेश शेततळ्यात पडला.

कोपरगाव (जि.अहमदनगर) : शेतातील शेततळ्यावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव शिवारातील रावसाहेब शिंदे यांच्या शेतात मंगळवारी ( दि.८) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. पूजा नीलेश शिंदे (वय २३), नीलेश रावसाहेब शिंदे (वय २६) असे मृत झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे.

वीजपुरवठा सुरू नसल्याने पूजा व तिचा पती नीलेश हे पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेले होते. याच दरम्यान पाणी भरताना पाय घसरून नीलेश शेततळ्यात पडला. त्याच्या पाठोपाठ त्याला वाचवण्यासाठी पूजाने पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले असल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी बुधवारी (दि.९) दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले व ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना शेततळ्याबाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नीलेश हा उच्चशिक्षित होता व वर्षभरापूर्वीच त्याचा पूजा हिच्याशी विवाह झाला होता. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अंचलगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :marriageलग्नdrowningपाण्यात बुडणेFarmerशेतकरी