शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
5
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
6
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
7
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
8
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
9
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
10
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
11
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
12
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
13
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
14
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
15
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
16
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
17
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
18
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
19
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
20
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाशे शिक्षकांच्या बदल्यांवर हरकती : महिनाभराच्या उशिराने सुनावणीला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 13:36 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सव्वाशे शिक्षकांनी बदली प्रक्रियेवर हरकती नोंदविल्या असून, या हरकतींवर सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सुनावणी होणार आहे. 

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सव्वाशे शिक्षकांनी बदली प्रक्रियेवर हरकती नोंदविल्या असून, या हरकतींवर सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सुनावणी होणार आहे. बदली प्रक्रियेवर आक्षेप असणाऱ्यांच्या तक्रारींवर एका महिन्यात सुनावणी घेऊन निपटारा करावा, असा आदेश असताना दोन महिन्यानंतर या सुनावणीला मुहूर्त सापडला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. गैरसोेयीच्या बदल्या झाल्यामुळे अनेक शिक्षक नाराज झाले होते. तर काही शिक्षकांनी आॅनलाईनवर भरलेल्या आॅप्शनपैकी एकही शाळा मिळाली नव्हती. एका शाळेवर दोघांच्या बदल्या झाल्याचेही प्रकार घडले होते़ शाळांचा आॅनलाईन आॅप्शन भरताना जेथे जागा आहेत, अशाच शाळा दिसणे आवश्यक होते़ मात्र, तेथे सर्वच शाळांची यादी येत होती़ त्यामुळे ज्या शाळेवर रिक्त जागाच नाही, अशा शाळांचे आॅप्शनही भरण्यातआले़ त्यामुळे रिक्त शाळा न मिळाल्यामुळे शिक्षकांना समायोजनामध्ये दूरच्या शाळेवर जावे लागले़ यातून काही शिक्षकांच्या गैरसोयी झाल्या़ त्यामुळे शिक्षण विभागाने केलेल्या बदलीप्रक्रियेवर अनेक शिक्षकांनी हरकती नोंदविल्या आहेत़ बदली झाल्यानंतर सात दिवसात हरकती घेऊन त्यावर एका महिन्यात सुनावणी घेण्यात यावी, असा आदेश सरकारने बजावला होता़ मात्र, बदली प्रक्रिया होऊन २ महिने झाले तरी शिक्षकांच्या तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली नव्हती़ आता २१ आॅगस्ट रोजी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी तक्रारदार शिक्षकांच्या अर्जावर सोमवारी (दि़२६) सुनावणी घेण्यात येणार असल्याचे कळविले आहे़ सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात तक्रारदार शिक्षकांनी विहित कागदपत्रांसह सुनावणीस उपस्थित राहण्याच्या सूचना काठमोरे यांनी केल्या आहेत़

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातून सर्वाधिक तक्रारी
शिक्षकांच्या बदल्यांवरुन सर्वाधिक तक्रारी पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातून करण्यात आल्या आहेत़ कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्वाधिक ३१ शिक्षकांनी बदल्यांबाबत तक्रारी केल्या आहेत़ त्याखालोखाल अकोले तालुक्यातून २८, पारनेरमधून ९, राहात्यातून २ , शेवगावमधून ६, नगर तालुक्यातून ८, कोपरगावमधून १३, पाथर्डीमधून ६, राहुरीतून १, श्रीगोंद्यातून ७, नेवासातून १०, संगमनेरमधून २ अशा एकूण १२३ शिक्षकांनी बदल्यांबाबत तक्रारी केल्या आहेत़

श्रीरामपूर ठरला समाधानी शिक्षकांचा तालुका
बदली प्रक्रियेत असमाधानी असलेल्या शिक्षकांची संख्या सर्वाधिक कर्जत, जामखेड, अकोले तालुक्यात आहे़ मात्र, श्रीरामपूर तालुक्यातील एकाही शिक्षकाचे तक्रारदार यादीत नाव नाही़ त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील सर्व शिक्षक बदल्यांबाबत समाधानी आहेत, असे सांगण्यात येते़ तर राहुरी तालुक्यातील केवळ १ व राहाता आणि संगमनेर तालुक्यातील प्रत्येकी २ शिक्षकांनी बदली प्रक्रियेवर हरकत घेतली आहे़

नियोजित कामांमुळे शिक्षकांच्या तक्रारींवर सुनावणी घेण्यास उशीर झाला. या सुनावणीसाठी शिक्षकांना बोलावण्यात आले असून, काही शिक्षकांची नावे यादीत नव्हती. अशा शिक्षकांनाही फोनवरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे बदलीबाबत तक्रार असलेल्या शिक्षकांची संख्या १३० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. - रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद