शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून ड्युटी करणाऱ्या होमगार्डचे मानधन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:27 IST

जिल्ह्यात १ हजार ८५१ होमगार्ड असून यात १५० महिला कार्यरत आहेत. ५० पेक्षा जास्त वय असलेले १४२ होमगार्ड आहेत. ...

जिल्ह्यात १ हजार ८५१ होमगार्ड असून यात १५० महिला कार्यरत आहेत. ५० पेक्षा जास्त वय असलेले १४२ होमगार्ड आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ५० पेक्षा जास्त वय असलेल्या होमगार्डकडून गेल्या वर्षभरापासून सेवा घेतली जात नाही. मात्र जे सेवेत नियमित आहेत त्यांचेही वेळेवर मानधन मिळेना अशी परिस्थिती आहे. सन, उत्सव, बंदोबस्त तसेच विविध आपत्तीत होमगार्ड यांना सेवेसाठी बोलविले जाते. त्यांना प्रतिदिन ६७० रुपये मानधन दिले जाते. कोरोनाकाळ केलेल्या सेवेचे मानधन अनेक होमगार्डसाठी मोठा आर्थिक आधार ठरले आहे. सध्या मात्र फेब्रुवारी ते मे महिन्याचे मानधन रखडले आहे.

-----------------

जगायचे कसे?

होमगार्ड ही नोकरी नसून सेवा आहे. नियमित नोकरी, व्यवसाय करून आम्ही ही सेवा करतात. कोरोनाकाळात मात्र अनेक होमगार्डचा नियमित व्यवसाय व खासगी नोकऱ्या ठप्प झाल्या. आपत्ती काळात पोलीस प्रशासनाकडून सेवेला बोलविल्यानंतर प्रवास व जेवणाचा खर्च आम्हालाच करावा लागतो. त्यामुळे सेवेचे तत्काळ मानधन मिळणे गरजेचे आहे. मानधन रखडल्याने आमच्यासमोर सध्या दुहेरी संकट ओढावले असल्याची प्रतिक्रिया काही होमगार्डस‌्नी व्यक्त केली.

----------------------

६० टक्के होमगार्डचे लसिकरण

होमगार्डचे प्रभारी केंद्र नायक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ६० टक्के होमगार्डचे कोरोना लसिकरण झाले आहे. १८५१ पैकी ७२९ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत तर ३४५ जणांनी पहिला डोस घेतला आहे. ५० पेक्षा जास्त वय असलेल्या ७३ जणांचे लसिकरण झाले आहे.

--------------------

५० पेक्षा जास्त वय असलेल्या होमगार्डस् ना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सध्या त्यांची सेवा घेतली जात नाही. प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर त्यांना नियमित सेवा दिली जाणार आहे. कोरोनाकाळात रोटेशनप्रमाणे इतर होमगार्ड नियमित सेवेत आहेत. आतापर्यंत ६० टक्के पेक्षा जास्त होमगार्डचे लसिकरण झालेले आहे. मानधनाचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेले आहेत. येत्या काही दिवसांत माधन वर्ग होईल.

- संजय शिंदे, प्रभारी केंद्र नायक, होमगार्ड विभाग