उसाच्या थकीत एफआरपीसाठी श्रीगोंदा तहसीलसमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:24 IST2021-08-13T04:24:53+5:302021-08-13T04:24:53+5:30

श्रीगोंदा : तालुक्यातील चारही कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे राहिलेले एफआरपीप्रमाणे पेमेंट द्यावे. कारखान्यांनी वाढविलेली सभासदांच्या शेअर्सची रक्कम सभासदांकडून ...

To hold in front of Shrigonda tehsil for FRP in sugarcane exhaustion | उसाच्या थकीत एफआरपीसाठी श्रीगोंदा तहसीलसमोर धरणे

उसाच्या थकीत एफआरपीसाठी श्रीगोंदा तहसीलसमोर धरणे

श्रीगोंदा : तालुक्यातील चारही कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे राहिलेले एफआरपीप्रमाणे पेमेंट द्यावे. कारखान्यांनी वाढविलेली सभासदांच्या शेअर्सची रक्कम सभासदांकडून घेऊ नये, आदी मागण्यांसाठी स्वतंत्र क्रांतिकारी लोकसेवा संघाने सोमवारी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

यावेळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, अप्पर तहसीलदार चारुशीला पवार, नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले यांना निवेदन दिले. राज्य साखर संघाचे संचालक घनश्याम शेलार, नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.

भाजपचे नेते राजेंद्र म्हस्के म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी सुरू असलेला खेळ साखर कारखानदारांनी थांबवावा. लवकरात लवकर एफआरपीप्रमाणे पेमेंट जमा करावे; अन्यथा सहकारमंत्र्यांच्या दालनात जाऊन उपोषण केले जाईल.

काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर म्हणाले, कोरोनामुळे शेतकरी वर्ग अतिशय अडचणीत आहे. तरी कारखानदारांनी या गोष्टी गांभीर्याने घेऊन एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात पेमेंट जमा करावे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ म्हणाले, मागासवर्गीय समाजातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत सभासद करावे.

यावेळी संतोष इथापे, टिळक भोस, माउली मोटे, विक्रम शेळके, भाऊसाहेब मांडे, नंदूकुमार ताडे, बळीराम बोडखे, राजेंद्र नागवडे, कांतीलाल कोकाटे यांची भाषणे झाली. यावेळी प्रदीप खामगळ, नंदू ससाणे, सुभाष दरेकर, संतोष शिंदे, अक्षय वागस्कर, महादेव म्हस्के, शिवराज ताडे आदींची उपस्थिती होती.

-----

१२ श्रीगोंदा धरणे

श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनाप्रसंगी महसूल अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: To hold in front of Shrigonda tehsil for FRP in sugarcane exhaustion