रिक्षा चालक, हमाल बांधवांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:15 IST2021-07-08T04:15:28+5:302021-07-08T04:15:28+5:30
रोटरी इंटिग्रिटीचे पदाधिकारी व डॉक्टरांनी रेल्वे स्टेशन येथील रिक्षा चालक, हमाल बांधवांची मधुमेह तपासणी करून, त्यांना सदृढ आरोग्यासाठी मार्गदर्शन ...

रिक्षा चालक, हमाल बांधवांची आरोग्य तपासणी
रोटरी इंटिग्रिटीचे पदाधिकारी व डॉक्टरांनी रेल्वे स्टेशन येथील रिक्षा चालक, हमाल बांधवांची मधुमेह तपासणी करून, त्यांना सदृढ आरोग्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष सुयोग झंवर, सचिव हेमंत लोहगावकर, डॉ.रिजवान शेख, निखिल कुलकर्णी, पुनीत वोहरा आदी सदस्य उपस्थित होते.
रिक्षा चालकांची रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारात तर हमाल बांधवांची मालधक्का येथे डॉ.मनोज लोंढे, निखिल काळे व अनंत हटवटे यांनी तपासणी केली. शहरात रिक्षा चालक व हमाल वर्गाची संख्या मोठी असून, त्यांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून अनेकांना मधुमेह असल्याचे निदर्शनास आल्याने, त्यांना यावेळी व्यायाम, आहाराबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
----------------------
मनातील भीती दूर झाली
मधुमेह असल्याची जाणीव होत होती. मात्र, तपासणी, डॉक्टरांचा व औषधोपचाराच्या खर्चाच्या भीतीने दवाखान्यात गेलो नाही. मात्र, रोटरी क्लबने तपासणी करून मधुमेह असल्याचे सांगून योग्य मार्गदर्शन करून मनातील भीती दूर केली आहे. पथ्य पाळून मधुमेह कमी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना शिबिरातील एका रिक्षा चालकाने व्यक्त केली.
----------------------
फोटो ०७ शिबिर
ओळी-रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने स्टेशन येथील रिक्षा चालक, हमाल बांधवांची मधुमेह तपासणी करण्यात आली. यावेळी रोटरीचे अध्यक्ष सुयोग झंवर, सचिव हेमंत लोहगावकर, डॉ.रिजवान शेख, निखिल कुलकर्णी, पुनीत वोहरा, डॉ.मनोज लोंढे, निखिल काळे व अनंत हटवटे आदी.