शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्री सोडून ‘त्याने’ सुरू केले चहाचे हॉटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:21 IST

कर्जत : दारूविक्रीचा व्यवसाय सोडून एखाद्याने चक्क चहा विक्रीचाच व्यवसाय सुरू केला तर कुणालाही नवल वाटणारच. हा बदल करून ...

कर्जत : दारूविक्रीचा व्यवसाय सोडून एखाद्याने चक्क चहा विक्रीचाच व्यवसाय सुरू केला तर कुणालाही नवल वाटणारच. हा बदल करून दाखविला आहे कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी.

पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे कारवाया करत असताना ते अनेकांची मने वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. अवैध व्यवसायामुळे समाजात आपली प्रतिमा मालिन होते. मान-सन्मान मिळत नाही. त्यामुळे सन्मानजनक व्यवसाय करून आपण जबाबदार नागरिक आहोत, अशी ओळख निर्माण करून द्यावी, असे प्रत्येकवेळी अवैध व्यावसायिकांना ते मार्गदर्शन करतात. प्रसंगी त्यांनी अनेकांवर मोठ्या कारवायाही केल्या.

कर्जत शहरातील बाळासाहेब माने हे अवैध दारूविक्री करत होते. त्यामुळे त्यांच्यावर यापूर्वी वारंवार कारवाया करण्यात आल्या होत्या. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी माने यांना पोलीस ठाण्यात बोलावून ‘तुम्ही अवैध धंदे करू नका’ अशी वेळोवेळी समज दिली. चांगला व सन्मानजनक व्यवसाय करा, मी आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला मदत करेल, असे वेळोवेळी त्यांना सांगून जबाबदार नागरिकाची भावना पटवून दिली. त्यांची ही तळमळ दारूविक्री व्यवसाय करणारे बाळासाहेब माने यांचे मनपरिवर्तन करणारी ठरली. त्यांनी भांडेवाडी येथे करमाळा रस्त्यालगत श्री साई कृपा नावाने चहाचे हॉटेल सुरू केले. यादव एवढ्यावरच थांबले नाहीत. ते माने यांच्या हॉटेलवर गेले. तेथे चहाची चव चाखत नवीन व्यवसायासाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने उपस्थित होते.

---

साहेब, आता अवैध धंदा करणार नाही

साहेब, आता पुढील काळात कसलाही अवैध व्यवसाय करणार नाही, असा शब्द देतो. दारूविक्रीचा व्यवसाय सोडून चक्क चहा विकणाऱ्या या नवख्या व्यावसायिकाच्या या शब्दाने चंद्रशेखर यादवही भारावले.

---

३० कर्जत चहा

कर्जत-करमाळा रस्त्यालगत बाळासाहेब माने याने सुरू केलेल्या हॉटेलमध्ये चहाचा आस्वाद घेताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व इतर.