शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात निवडणुकीचा महाराष्ट्रात काँग्रेससाठी सकारात्मक परिणाम; अशोक चव्हाण यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 18:45 IST

महाराष्ट्रात काँग्रेसला पोषक वातावरण असून गुजरात निवडणुकीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर सकारात्मक होईल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिर्डीत केला.

शिर्डी : महाराष्ट्रात काँग्रेसला पोषक वातावरण असून गुजरात निवडणुकीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर सकारात्मक होईल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिर्डीत केला. गेल्या निवडणुकीचा अपवाद वगळता महाराष्ट्र काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे़ यापुढेही महाराष्ट्रात काँगे्रसच एक नंबरवर राहिल, असा दावा त्यांनी केला.माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या चव्हाण यांनी शिर्डीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे शांतीनाथ आहेर, अशोक खांबेकर, भाऊसाहेब कडू आदींची उपस्थिती होती.गुजरात निवडणुकीत अमित शहांनी दिडशे जागा मिळण्याचा दावा केला होता. पण जनतेने २८ टक्के जीएसटी वजा करून त्यांना मतदान केल्याची उपरोधिक टोलाही चव्हाण यांनी लगावला. गेल्या सहा निवडणुकांच्या तुलनेत यंदा प्रथमच गुजरातमध्ये पक्षाची चांगली कामगिरी झाली आहे. राहुल गांधीच्या झंझावातामुळे व मेहनतीमुळेच हे घडले. तसेच काँग्रेसचे असंख्य नेते त्यांच्यामुळे जोमाने कामाला लागले. त्यामुळेच मतात व निवडून येणा-या जागेत वाढ झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.राज्यातील काँग्रेस नेत्यांनी अगोदर आपला जिल्हा सांभाळावा व मग राज्यात लक्ष द्यावे, असा सल्लाही चव्हाण यांनी दिला. आपण आपल्या जिल्ह्यात काय करतो, पक्ष संघटना कशी आहे, कार्यकर्ते काम करतात का, निकाल चांगले लागतात का याच मुल्यमापन झालं पाहिजे, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस