शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

शेवगावसह तालुका पाणी टंचाईने जेरीस

By admin | Updated: October 4, 2024 11:59 IST

शेवगाव : शेवगाव तालुक्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, वाढते भारनियमन आदी मुलभूत समस्यांची तीव्रता वाढत आहे.

शेवगाव : शेवगाव तालुक्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, वाढते भारनियमन आदी मुलभूत समस्यांची तीव्रता वाढत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटलेल्या गावांमध्ये टँकर सुरू करण्याच्या मागणीचे प्रस्ताव दीर्घकाळ रेंगाळल्याने संताप व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे दुष्काळाशी सामना करणार्‍या गावांना पाणी टंचाईची तीव्रता प्रकर्षाने जाणवत आहे. मार्च महिन्यापासूनच अनेक गावांतून पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी होऊ लागली. वीज बिलाच्या वसुलीसाठी ‘महावितरण’ ने व पाणीपट्टीची थकबाकी वाढल्याने जि.प.च्या पाणी पुरवठा विभागाने प्रादेशिक नळ योजना पुढे चालविण्यास असमर्थता दर्शविल्याने एकूणच तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. तालुक्यातील तहानलेल्या आखेगाव, आंतरवाली, आव्हाणे, लखमापुरी, लाडजळगाव, सोनविहीर, जोहरापूर, थाटे, दिवटे, अधोडी, खडके, मडके, खामपिंप्री, सालवडगाव, अमरापूर, ढोरजळगाव ने व भातकुडगाव अशी १९ गावे आणि वाड्या, वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याच्या टँकर मागणीचे प्रस्ताव जवळपास महिनाभरापासून जिल्हास्तरावर रेंगाळल्याने नागरिकांच्या भावना तीव्र बनल्या आहेत. टंचाई आढावा बैठक शेवगाव येथे आमदार चंद्रशेखर घुले यांच्या उपस्थितीत आयोजित टंचाई निवारण आढावा बैठकीत वरील गावातील नागरिकांनी याप्रश्नी त्यांचे लक्ष वेधून तातडीने टँकर सुरू करण्याची तसेच टँकरचे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार पाथर्डी प्रांताधिकारी कार्यालयास द्यावे, अशी मागणी केली. (तालुका प्रतिनिधी) हातपंपाचे पाणी आटले तालुक्यातील ५२० हातपंपांपैकी सुमारे दीडशे हातपंप पूर्ण क्षमतेने सुरू असून, उर्वरित हातपंप पाणी पातळी खालावल्याने त्यावर अवलंबून असलेल्या परिसराचा पाणी पुरवठा अडचणीत आहे.