ग्रामविकास अधिकाऱ्याला ग्रामपंचायतीत कोंडले, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

By शेखर पानसरे | Updated: March 25, 2023 17:48 IST2023-03-25T17:48:01+5:302023-03-25T17:48:25+5:30

या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात ग्रामविकास अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Gram Vikas Adhikari had been locked into Gram Panchayat | ग्रामविकास अधिकाऱ्याला ग्रामपंचायतीत कोंडले, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

ग्रामविकास अधिकाऱ्याला ग्रामपंचायतीत कोंडले, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर : गाय गोठ्याची यादी दाखवा, असे म्हणत ग्रामविकास अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकाऱ्याला कोंडले. हा प्रकार शुक्रवारी (दि.२४) दुपारी तीन वाजताच्या सुमारास तालुक्यातील अंभोरे ग्रामपंचायत कार्यालयात घडला. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात ग्रामविकास अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

    विशाल संजय गायकवाड (रा. अंभोरे, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अंभोरे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अरुण गोविंद जेजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गायकवाड विरुद्ध गुन्हा दाखल झाला. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी. के. ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल सानप अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: Gram Vikas Adhikari had been locked into Gram Panchayat