'...म्हणून ग्रामपंचायत निवडणुकींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ द्या'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 16:37 IST2020-12-29T16:35:02+5:302020-12-29T16:37:52+5:30
आ.विखे पाटील यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

'...म्हणून ग्रामपंचायत निवडणुकींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ द्या'
शिर्डी : ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात इंटरनेट सुविधेत निर्माण होत असलेल्या अडचणी लक्षात घेवून लक्षात घेवून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून देवून ऑफलाईन अर्ज घेण्यास परवानगी देण्याची मागणी भाजपाचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात आ.विखे पाटील यांनी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत असलेली गर्दी आणि नेट सुविधेतील अडथळ्यामुळे आयोगाच्या वेबसाईट हॅंग होण्याचे प्रमाण वाढल्याने इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यात मोठ्या समस्या निर्माण होत असल्याकडे आ.विखे पाटील यांनी आयोगाचे लक्ष वेधले आहे. त्यातच मागील तीन दिवस लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रही शासकीय कार्यलयातून वेळेत मिळाली नसल्याची बाब आ. विखे पाटील यांनी लक्षात आणून दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत असलेल्या या आडचणी गृहीत धरून ऑफलाईन अर्ज दाखल करून घेण्याबाबत आयोगाने विचार करून मुदत वाढही द्यावी आशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.