कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा मुळा नदीत बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 11:34 IST2020-08-26T11:33:34+5:302020-08-26T11:34:53+5:30

कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा पाय घसरुण मुळा नदीच्या पाण्यात पडून मृत्यु झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथे मंगळवारी घडली. 

A girl who went to wash clothes drowned in a river | कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा मुळा नदीत बुडून मृत्यू 

कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा मुळा नदीत बुडून मृत्यू 

म्हैसगाव : कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा पाय घसरुण मुळा नदीच्या पाण्यात पडून मृत्यु झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथे मंगळवारी घडली. 

         आश्विनी संपत पवार ( वय ११, रा. चिखलठाण ) असे मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. कपडे धुण्यासाठी आश्विनी नदीवर गेली होती. ती लवकर घरी न आल्याचे आजोबा नामदेव पवार यांच्या लक्षात  आले. त्यांनी नदीवर जावून पाहणी केली असता ती पाण्यात पडल्याचे लक्षात आले. नंतर नदीच्या पाण्यामध्ये बुड्या मारून मृतदेह शोधून काढला. सांयकाळी मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथील सरकारी रुग्णालायात पाठवण्यात आला. 

Web Title: A girl who went to wash clothes drowned in a river