गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला नगरमध्ये परवानगी नाकारली
By अण्णा नवथर | Updated: September 26, 2023 16:11 IST2023-09-26T16:10:45+5:302023-09-26T16:11:22+5:30
सावेडी उपनगरातील सार्वजनिक गणेश मंडळाने गुरुवारी (दि. २८) गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु, या कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकरली आहे.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला नगरमध्ये परवानगी नाकारली
अहमदनगर: सावेडी उपनगरातील सार्वजनिक गणेश मंडळाने गुरुवारी (दि. २८) गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु, या कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकरली आहे.
येत्या गुरुवारी गणेश विसर्जन होणार आहे. मिरवणूक काढून विसर्जन करण्यात येते. सावेडी उपनगरातील एका सार्वजनिक गणेश मंडळाने विसर्जनाच्या दिवशी गुरुवारी गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून परवानगी मागितली होती. ही परवानगी पोलिसांनी नाकरली आहे. विसर्जन मिरवणूकांना अडथळा होऊ शकतो, त्यामुळे कार्यक्रमाला परवनगी नाकारण्यात आली असल्याचे शहर विभागाचे पोलिस उपधीक्षक अनिल कातकडे यांनी सांगितले.