शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

By admin | Updated: April 25, 2016 23:20 IST

अहमदनगर : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली.

अहमदनगर : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. टोळीकडून तीन मोटारसायकलसह ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगर-पुणे रोडवरील केडगाव फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तात्यासाहेब अण्णासाहेब फुलमाळी (वय २३), अनिल सोपान जाधव (वय १८), शिवाजी हरिभाऊ जाधव (वय २०), गोरख अण्णा फुलमाळी (वय २६), काळू विठ्ठल जाधव (वय ३२), बाळू भाऊसाहेब जाधव (वय २५, धंदा-मजुरी, रा. उंबरी, मोकळओहळ, ता. राहुरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे तीन मोटारसायकली, कुऱ्हाडीचा दांडा, कुऱ्हाडीचे पाने, कोयते, गलोल, पाईप असा ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.केडगाव परिसरात रात्री पोलिसांची गस्त सुरू असताना केडगाव-सोनेवाडी परिसरात सात संशयित फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सात जणांची कसून झडती घेतली असता त्यांच्याकडे शस्त्रे आढळून आली. पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी उपनिरीक्षक गजानन करेवाड तपास करीत आहेत. कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी प्रताप भगवान गायकवाड (वय २६, रा. वाघ गल्ली, नालेगाव) याला सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी रविवारी रात्री अटक केली. फरार असलेल्या गायकवाड याला पाटील यांनी सापळा लावून पकडले. (प्रतिनिधी)