लाल टोपी, मेहंदी रंगाचे मास्क, भरदिवसा घरात आले अन्...; विवाहितेवर सामूहिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:29 IST2025-06-19T17:29:59+5:302025-06-19T17:29:59+5:30

अहिल्यानगरमध्ये चौघांनी एका विवाहितेवर घरात घुसून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Gang rape of married woman after entering house in Ahilyanagar city case against four | लाल टोपी, मेहंदी रंगाचे मास्क, भरदिवसा घरात आले अन्...; विवाहितेवर सामूहिक अत्याचार

लाल टोपी, मेहंदी रंगाचे मास्क, भरदिवसा घरात आले अन्...; विवाहितेवर सामूहिक अत्याचार

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहरात एका अठरा वर्षीय विवाहितेवर चार अनोळखी इसमांनी तिच्या घरात घुसून सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात चार इसमांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पीडितेच्या फिर्यादीनुसार ती घरी एकटीच होती. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पाणी भरण्यासाठी ती मोटार लावत होती. तेव्हा दोन दुचाकीवरून चार अनोळखी इसम तेथे आले. त्यांनी तोंडाला काळे मास्क लावलेले होते. दुचाकीवरून उतरून ते थेट घरात घुसले. त्यांनी पीडितेचे तोंड दाबले व तिला उचलून बेडरूममध्ये नेले. तेथे पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर चौघे दुचाकीवरून निघून गेले. या घटनेनंतर पीडिता व तिचे नातेवाईक कोतवाली पोलिस ठाण्यात आले. घडलेला प्रकार पीडितेने पोलिसांना सांगितला. पोलिसांनी पीडितेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पीडितेच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. मात्र त्यातून माहिती मिळू शकलेली नाही. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक तेजश्री थोरात करत आहेत.दरम्यान, पीडिता आरोपींना ओळखू शकली नाही. परंतु, चारही आरोपींनी लाल रंगाची टोपी व मेहंदी रंगाचे मास्क घातलेले होते, अशी माहिती पीडितेने पोलिसांना दिली. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

पीडितेची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पीडिता ही गृहिणी आहे. तिचे पती रिक्षाचालक असून सासू धुणीभांडी करते. पती व सासू बाहेर कामाला गेले होते. त्यावेळी ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तपासासाठी तीन पथके

 आरोपींच्या शोधासाठी तीन पथके केली आहेत. या कुटुंबाचा कुणासोबत वाद होता का? याचाही शोध घेत आहेत. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.

Web Title: Gang rape of married woman after entering house in Ahilyanagar city case against four