सिद्धटेक : दळणवळणासाठी रस्ते महत्त्वाची साधने असतात. भीमा नदीकाठच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मतदार संघाच्या विकासासाठी रस्ते व्यवस्थित असले पाहिजेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. संबंधितांनी रस्त्याची कामे दर्जेदार करावीत, अशा सूचना आमदार राेहित पवार यांनी दिल्या.
भांबोरा (ता. कर्जत) येथील रस्ता कामाच्या भूमिपूजन प्रसंगी मंगळवारी ते बोलत होते. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत दोन कोटी चाळीस लाख रुपये खर्चून रस्त्याचे काम होणार आहे. यावेळी प्रधानमंत्री सडक योजनेचे कार्यकारी अभियंता ह. नी. सानप, उपअभियंता दशरथ चौरे, कनिष्ठ अभियंता महेश खंडागळे, सरपंच माधुरी लोंढे, उपसरपंच कृष्णा शेळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सागर लोंढे, ग्रामपंचायत सदस्य मनिषा गोसावी, अनमोल लोंढे, सचिन जगताप, प्रमोद शेळके, राजेंद्र लोंढे, दीपक लोंढे, प्रमोद जगताप, नवनाथ कायगुडे, भिवराज कायगुडे, रमेश जांभळे, राहुल हरिहर उपस्थित होते. हे काम मे. एस. ए. पांडुळे या ठेकेदाराला देण्यात आले आहे. सिद्धेश राजेंद्र लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त भांबोरा बाजारतळ येथे पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. भांबोरा गावचे ग्रामदैवत सिद्धेश्वर हे ‘क’ वर्ग देवस्थानमध्ये आहे. मंदिराच्या सभामंडपासाठी भरीव तरतूद करण्याची ग्वाही पवारांनी दिली. (वा.प्र.)
----
२५ भांबोरा
भांबोरा येथील रस्ता कामाचे भूमिपूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.