शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीत संघर्षाची चिन्हे

By admin | Updated: August 19, 2014 02:15 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मंगळवारपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाला सुरूवात होणार आहे.

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मंगळवारपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाला सुरूवात होणार आहे. मात्र, जिल्ह्यात मतदारसंघातील संभाव्य अदला-बदलाबाबत आघाडीतील दोन्ही पक्षाची चर्चा झालेली नाही. दोघांकडून नगरशहर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघावर दावा सांगण्यात येत असल्याने यावरून संघर्षाची चिन्हे आहेत.विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीबाबत शिक्कामोर्तब झाल्यानंतर ज्या मतदारसंघात दोनपेक्षा जास्त वेळी पराभव झालेल्या जागा आघाडीतील दुसऱ्या मित्र पक्षाला देण्याचा निर्णय झाला होता. याच फॉर्मुल्याच्या आधारे जिल्ह्यातील नगर शहर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात काँग्रेसचा सलग चार वेळा पराभव झालेला आहे. तशीच अवस्था नगर शहर मतदारसंघाची आहे. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद मोठी असल्याने ही जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहे.शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पक्षीय बैठकीत याबाबतचा अहवाल देण्यात आलेला आहे. कर्जत-जामखेड आणि नगरशहरात जोर लावल्यास या ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळणे शक्य होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या वाटाघाटीत या दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येतील असा विश्वास पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उमेदवारांबाबत अंतिम निर्णय खासदार पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पालकमंत्री मधुकरराव पिचड घेणार आहेत. दुसरीकडे पारनेर, कोपरगाव आणि राहुरी तालुक्यात राष्ट्रवादीचा पराभव होत असून या जागेवर उमेदवार उभा करायचा की त्या मित्र पक्षाला द्यायच्या यावर राष्ट्रवादीत मौन आहे. यात राहुरी, कोपरगाव वगळता अन्य ठिकाणी पक्षाकडे सध्या तरी प्रबळ उमेदवार नाही आणि ही वस्तुस्थिती पक्षश्रेष्ठींनाही माहिती आहे.नगर शहर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघ काँग्रेसचा आहे. या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नाही, असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आलेले आहे. दोन दिवसांपूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत. असे असले तरी मतदारसंघातील संभाव्य बदलाबाबत वरिष्ठ पातळीवरूनच निर्णय घेण्यात येईल. शहर मतदारसंघाच्या उमेदवारी बाबत पक्षाकडून निर्णय घेण्यात येईल आणि तो अंतिम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)