खळबळजनक! जुन्या वादातून दोन गटात कोयता, चाकूने सशस्त्र हाणामारी; ४ जणांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 23:20 IST2020-08-20T21:36:38+5:302020-08-20T23:20:46+5:30
विसापूर फाटा येथे जुन्या वादातून दोन गटात कोयता, चाकूने सशस्त्र हाणामारी झाली. यामध्ये चौघांची हत्या झाली.

खळबळजनक! जुन्या वादातून दोन गटात कोयता, चाकूने सशस्त्र हाणामारी; ४ जणांची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा : तालुक्यातील विसापूर फाटा येथे जुन्या वादातून दोन गटात कोयता, चाकूने सशस्त्र हाणामारी झाली. यामध्ये चौघांची हत्या झाली. सर्व जण पारधी या आदिवासी समाजातील आहेत. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
नातीक कुंजीलाल चव्हाण (वय ४०), श्रीधर कुंजीलाल चव्हाण (वय ३५), नागेश कुंजीलाल चव्हाण (वय १६), लिंब्या हाबºया काळे (वय २२, सर्व रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. यातील तिघे सख्खे भाऊ आहेत. घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही.