एमआयडीसीमधील चार कंपन्यावर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 16:19 IST2018-08-09T16:18:58+5:302018-08-09T16:19:05+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी एमआयडीसीमध्ये आक्रमक झालेले दिसले. दुपारच्या सुमारास कंपन्या बंद न केल्याने आंदोलकांनी दगडफेक केली.

एमआयडीसीमधील चार कंपन्यावर दगडफेक
अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी एमआयडीसीमध्ये आक्रमक झालेले दिसले. दुपारच्या सुमारास कंपन्या बंद न केल्याने आंदोलकांनी दगडफेक केली.
आंदोलकांनी मोटारसायकल रॅली काढली होती. त्यामध्ये कंपनीच्या परिसरात आल्यानंतर काही कंपन्या सुरु असल्याचे आंदोलनकर्त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आंदोलनकर्ते संतप्त झाले. इंडियन सिमलेस, सनफार्मा, क्रॉम्टन, एक्साईड कंपनीवर दगडफेक करण्यात आली.़याशिवाय क्लासिक व्हिल, आयएसएमटी, सुदर्शन डेअरी या कंपनीवर दगडफेक केली. यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.