शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

पाणी दुर्भिक्ष्यावर संशोधन करणारा परदेशी अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 16:13 IST

गेल्या १७ वर्षांपासून स्वित्झर्लंड येथील एक अवलिया ठिकठिकाणी भेटी देऊन संशोधन करीत आहे. याबाबत त्याने वेगवेगळे प्रयोगही केलेले आहेत.

संडे विशेष / बाळासाहेब काकडे  । श्रीगोंदा : महाराष्ट्रातील पाण्याचे दुर्भिक्ष्य कसे कमी करता येईल यावर गेल्या १७ वर्षांपासून स्वित्झर्लंड येथील एक अवलिया ठिकठिकाणी भेटी देऊन संशोधन करीत आहे. याबाबत त्याने वेगवेगळे प्रयोगही केलेले आहेत. कमीत कमी पाण्यावर जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखली कसे आणता येईल याबाबतही ते जनजागृती करीत आहेत.डॉ. आॅक्सर फ्लुक असे त्या परदेशी अवलियाचे नाव आहे. डॉ. फ्लुक हे गेल्या १७ वर्षापासून मुंबई विद्यापीठात जर्मन भाषेचे व्याख्यान देण्यासाठी येतात. त्यांनी भारतातील विविध भागात जाऊन पाण्याच्या दुर्भिक्ष्याबाबत निरीक्षण  केले आहे. त्यांना महाराष्ट्रातील शेती व शेतकºयांची गोडी लागली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, नगर येथील स्नेहालय व श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे या संस्थेशी त्यांची नाळ जोडली गेली आहे.डॉ. फ्लुक यांनी अलिबाग, मुरूड, राळेगण सिद्धी व चिखली (ता. श्रीगोंदा) येथे बाष्पीभवन कमी व्हावे यासाठी काय करता येईल. शेतीला कोणत्या वेळी पाणी दिले तर पाण्याची बचत करता येईल यावर प्रयोग केले. संध्याकाळी व सकाळी लवकर पिकाला पाणी दिले तर पाण्याची बचत होते. पिकाला दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊ शकते, असे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. पाणी बचतीबाबात ते गावोगावी जाऊन जनजागृती करत आहेत.लोणीव्यंकनाथला युवकांना मार्गदर्शनफ्लुक यांनी लोणी व्यंकनाथ, चिंभळे येथे तरुणांनी हाती घेतलेल्या वृक्ष लागवड प्रकल्पास भेट दिली. पाण्याचे वाढते बाष्पीभवन व पाण्याची बचत याबात त्यांनी युवकांना धडे दिले. शेतीत करिअर करायचे असेल तर पाण्याचे नियोजन करावेच लागेल, असा कानमंत्र त्यांनी दिला. यावेळी बंडू जगताप, गणेश खंडागळे, बापू कोकरे, गणेश जगताप, आशिष काकडे, नामदेव जठार, महेंद्र साळवे, बाळू जगताप, शफिक शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाforestजंगलenvironmentपर्यावरण