खरवंडीत जबरी चोरी; दोन लाखांसह पाच तोळे सोने लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:08 IST2020-08-02T12:08:09+5:302020-08-02T12:08:58+5:30

 पाथर्डी तालुक्यातील खरवंडी येथे रविवारी (२ आॅगस्ट) पहाटे येथील व्यावसायिक पांडुरंग तान्हाजी केळगंद्रे यांच्या घरी झालेल्या जबरी चोरीत एक लाख सत्तर हजारांच्या रकमेसह पाच तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले.

Forcible theft in Kharwandi; Five lakhs of gold with two lakhs | खरवंडीत जबरी चोरी; दोन लाखांसह पाच तोळे सोने लांबविले

खरवंडीत जबरी चोरी; दोन लाखांसह पाच तोळे सोने लांबविले

 पाथर्डी : तालुक्यातील खरवंडी येथे रविवारी (२ आॅगस्ट) पहाटे येथील व्यावसायिक पांडुरंग तान्हाजी केळगंद्रे यांच्या घरी झालेल्या जबरी चोरीत एक लाख सत्तर हजारांच्या रकमेसह पाच तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले.

 सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेले पांडुरंग केळगंद्रे हे खरवंडी गावाबाहेरील बायपास रोडलगत राहतात. रविवारी पहाटे १ ते २ वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी केळगंद्रे यांच्या शेजारच्या घरांना बाहेरुन कड्या लावल्या. त्यानंतर केळगंद्रे यांच्या घराचा कडी, कोंडा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर घरातील व्यक्तीना जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील एक लाख सत्तर हजारांच्या रकमेसह पाच तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे. 

 

Web Title: Forcible theft in Kharwandi; Five lakhs of gold with two lakhs