"मोदींच्या सभेला गर्दी जमविण्याची सक्ती, हे योग्य नाही"; बाळासाहेब थोरातांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 14:43 IST2023-10-23T14:42:31+5:302023-10-23T14:43:18+5:30
आ. थोरात यांनी सोमवारी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी संवाद साधला

"मोदींच्या सभेला गर्दी जमविण्याची सक्ती, हे योग्य नाही"; बाळासाहेब थोरातांची टीका
अरुण वाघमोडे
अहमदनगर: देशाचे पंतप्रधान अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात, ही चांगली बाब आहे. मात्र, त्यांच्या दौऱ्यासाठी लोकांची गर्दी जमावी, यासाठी अधिकाऱ्यांना टार्गेंट देणे अथवा सक्ती करणे ही आश्चर्याची गोष्ट असून ही बाब स्वत: पंतप्रधानांनाही आवडणार नाही. अशी टीका भाजप नेत्यांचा नामोल्लेख टाळून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
आ. थोरात यांनी सोमवारी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले पंतप्रधान येणार आहेत म्हणून अद्यापपर्यंत निळवंडे धरणातून पाणी साेडण्यात आले नाही. तसेच शिर्डी येथील दर्शन रांग व शैक्षणिक संकुल बांधून तयार होते. मात्र, त्याचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करावयाचे असल्याने ते जनतेसाठी खुले करण्यात आले नाही. ही बाब योग्य नाही. असे सांगत मराठा व धनगर आरक्षणाबाबत सरकारने दोन्ही समाजाला दिलासा मिळेल, असा सुवर्णमध्ये काढणे गरजेचे असल्याचे आ. थोरात म्हणाले.