शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

अन्न सुरक्षा अधिकारी लाचेच्या जाळ््यात

By admin | Updated: October 21, 2024 17:26 IST

अहमदनगर : रासायनिक द्रव्ये वापरून पिकविलेल्या आंब्यावर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणार्‍या अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे याला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पकडले.

अहमदनगर : रासायनिक द्रव्ये वापरून पिकविलेल्या आंब्यावर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणार्‍या अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे याला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पकडले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे यांनी आंबा विक्रीच्या दुकानात जाऊन दुकानातील आंब्याचा नमुना घेऊन तपासणी केली. आंब्याचा नमुना तपासणीला न पाठविण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी नगरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी कार्यालयात सापळा लावला. दहा हजार रुपयांची लाचेची रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारत असताना मंगळवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला आणि कावळे याला पकडले. कावळे यांनी ही रक्कम पंच साक्षीदारांसमवेत स्वीकारली. ही कारवाई नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. नगर- मनमाड रोडवरील आॅक्झिलिअम शाळेजवळ असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयातच ही रक्कम स्वीकारल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपअधीक्षक अशोक देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)