जामखेडमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या दुकानाला आग; ३५ लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 16:23 IST2020-06-02T16:22:56+5:302020-06-02T16:23:03+5:30

जामखेड येथील खर्डा रस्त्यालगत असलेल्या साई ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक दुकानात मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. यात ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Fire at transformer shop in Jamkhed; Loss of Rs 35 lakh | जामखेडमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या दुकानाला आग; ३५ लाखाचे नुकसान

जामखेडमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या दुकानाला आग; ३५ लाखाचे नुकसान

जामखेड : येथील खर्डा रस्त्यालगत असलेल्या साई ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक दुकानात मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. यात ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 याबाबत जामखेड पोलिसात प्रवीण उगले यांनी तक्रार दिली आहे. जामखेड-खर्डा रस्त्यालगत साई ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक दुकान आहे. नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेलो होतो. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास ठाणे अंमलदार व्ही. बी. चव्हाण यांचा फोन आला. तुमच्या दुकानाला आग लागली आहे. ताबडतोब दुकानाकडे गेलो. खेमानंद येथील रोहित्र (डिपी) बंद केले. अग्निशमन दलाला बोलावले व त्यांनी आग विझवली. परंतु तोपर्यंत दुकानातील मशिनरी, आॅईल, वायर व दुरुस्तीसाठी आलेले ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाले होते.

ट्रान्सफॉर्मरसाठी असलेल्या आॅईलमुळे आगीच्या ज्वाला मोठ्या प्रमाणावर भडकल्या होत्या. मोठे आवाज झाल्याने पत्रे उचकटले आहेत. दुकानाचे व आतील वस्तूचे जवळपास ३५ लाखाचे नुकसान झाले आहे, असे  उगले यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Fire at transformer shop in Jamkhed; Loss of Rs 35 lakh