विद्यार्थिनीकडून दीड लाखाची लाच घेताना प्राचार्यासह महिला लिपिक जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:26 IST2021-08-13T04:26:11+5:302021-08-13T04:26:11+5:30
प्राचार्य बापूसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे व लिपिक भारती बापूसाहेब इथापे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणातील ...

विद्यार्थिनीकडून दीड लाखाची लाच घेताना प्राचार्यासह महिला लिपिक जेरबंद
प्राचार्य बापूसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे व लिपिक भारती बापूसाहेब इथापे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणातील तक्रारदार हे गंगापूर तालुक्यातील रहिवासी असून, त्यांची मुलगी वडाळा महादेव येथील होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेते. तिच्या हजेरीची तडजोड करून तिला सर्टिफिकेट देण्यासाठी प्राचार्य हरिश्चंद्रे याने लाच मागितली होती. याबाबत येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली होती. गुरुवारी अधिकाऱ्यांनी कॉलेजमध्ये सापळा लावला तेव्हा हरिश्चंद्रे याने पंचांसमक्ष तक्रारदाराकडे १ लाख ४७ हजार ५०० रुपयांची मागणी केली. तसेच यावेळी ही रक्कम कॉलेजमधील लिपिक इथापे हिने स्वीकारली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम पवरे, दीपक करांडे, हवालदार संतोष शिंदे, पोलीस नाईक रमेश चौधरी, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, संध्या म्हस्के, हारून शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.