शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

कृषिकन्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST

कोपरगाव : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या प्रतीक्षा भाऊसाहेब देवकर यांनी कोपरगाव तालुक्यातील पढेगाव ...

कोपरगाव : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या प्रतीक्षा भाऊसाहेब देवकर यांनी कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील ज्ञानेश्वर कदम यांच्या शेतात माती परीक्षण प्रात्याक्षिकासह नुकतेच मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणात पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी तसेच रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी मातीचा नमुना घ्यावा व माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करण्याचा सल्ला उपस्थित शेतकरी बांधवांना दिला. याबरोबरच शेतातील मातीचे नमुने गोळा करून त्याचे परीक्षण केले. मातीमध्ये असणारे घटक जमिनीचा सामू , मातीचा प्रकार याविषयी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्यात आले. जमिनीची सुपीकता कशी वाढवावी व जमिनीमध्ये कोणत्या घटकाची कमतरता आहे. त्यासाठी काय उपाययोजना करावी, या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न के. के. वाघ कृषी महाविद्यालयांतर्गत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम सुरू आहे. कृषी पदवीधर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागात राहून शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करावे लागते. मात्र, सध्या कोरोनामुळे कृषीचे विद्यार्थी आपल्या परिसरातच हा कार्यक्रम राबवत आहेत. या उपक्रमांतर्गत कृषिकन्या प्रतीक्षा भाऊसाहेब देवकर यांनी पढेगाव येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशकुमार हाडोळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. परमेश्वरी पवार व प्रा. सुनील बैरागी यांचे मार्गदर्शन लाभले.

.......