शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ashok Kharat Case: भोंदू खरातला ऑस्ट्रेलियात पलायन करण्यापासून रोखले; पोलिसांची महिनाभर गुप्तता, ‘असा’ लावला छडा

By सुधीर लंके | Updated: March 24, 2026 07:36 IST

खरात याची नाशिक, अहिल्यानगरसह अन्य अनेक ठिकाणी मालमत्ता, तब्बल १५० परदेश दौरे, दक्षिण कोरियातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल, खरा भंडाफोड अहिल्यानगर पोलिसांनी केला.

सुधीर लंके, लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर : नाशिक येथील भोंदूबाबा कॅप्टन खरात स्वत: महिलांचे लैंगिक शोषण करतच होता, पण खरात त्याच्याकडे येणाऱ्या महिला-पुरुषांच्याही अशा संबंधांसाठी जोड्या जुळवत होता. या आधारे त्याने काही बड्या लोकांना ब्लॅकमेल केले असल्याची माहितीही पोलिस सूत्रांकडे आहे. दरम्यान, खरातचा खरा भंडाफोड अहिल्यानगरपोलिसांनी केला असून, त्यांनी त्याला ऑस्ट्रेलियात पलायन करण्यापासूनही रोखले. 

कॅप्टन खरातला १७ मार्चला नाशिक पोलिसांनी अटक केली. मात्र, या प्रकरणाचा तपास अहिल्यानगर पोलिस फेब्रुवारीपासून करत होते. १८ फेब्रुवारीला एका तरुणीने निरज जाधव हा काही छायाचित्रांच्या आधारे आपणाला ब्लॅकमेल करत असल्याची फिर्याद शिर्डी पोलिसांना दिली होती. जाधव हा खरातकडे कामाला होता. 

अहिल्यानगर पोलिसांनी निरजला त्याच्या घरी जाऊन शोधले, तेव्हा तो गायब होता. ‘कॅप्टन खरात याच्याबाबत निरजकडे काहीतरी महत्त्वाची कागदपत्रे आहेत. तुम्ही त्याला संरक्षण द्या, तरच तो वाचेल.  अशी विनंती त्यावेळी निरजच्या आईने पोलिसांना केली होती. निरजच्या दोन मित्रांनीही पोलिसांकडे यास दुजोरा दिला. पुढे पोलिसांनी निरजला शोधून संरक्षण दिले. त्याने ७ मार्च रोजी अहिल्यानगर पोलिसांना खरातचे व्हिडीओ दिले. स्वत: पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे या तपासावर लक्ष ठेऊन होते. अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व इतर टीमही तपासात होती. 

पोलिसांनी बाळगली गोपनीयता

कॅप्टन खरातला शिर्डीत ९ मार्च रोजीच आरोपी करण्यात आले होते. याबाबत अहिल्यानगर पोलिसांनी कमालीची सावधानता बाळगली. चाकणकर फोन करत असताना पोलिसांनी त्यांना या तपासाबाबत काहीही सुगावा लागू दिला नाही.   

रूपाली चाकणकर का आणत होत्या दबाव? 

१८ फेब्रुवारीला ज्या तरुणीने शिर्डी पोलिसात निरज जाधवविरुद्ध तक्रार दिली, त्यामागे कॅप्टन खरातच होता, असा संशय आहे. त्यानेच बहुधा या तरुणीला पोलिसांकडे पाठविले. 

या प्रकरणात पोलिस निरजला अटक न करता फिर्यादी मुलीचाच उलट तपास करत असल्याचे लक्षात आल्याने महिला आयोगाच्या मावळत्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी फोन करून अहिल्यानगर पोलिसांना फैलावर घेतले होते. 

१३ मार्चला त्यांनी आयोगाकडून पोलिसांना मेलच पाठविला. १७ मार्चला यावर आयोगात खास सुनावणी घेत अहिल्यानगर पोलिसांना धारेवर धरले. चाकणकर एवढा दबाव का आणत होत्या, हे संशयास्पद आहे.

किती महिलांचे शोषण, ते पुरुष कोण असावेत? कॅप्टन खरात स्वत: महिलांचे लैंगिक शोषण करत होता. नंतर यातील पीडित व इतर काही महिलांचाही धनिक पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी वापर करत होता,  अशी धक्कादायक माहिती पोलिसांना मिळालेली आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

खरातने केली होती परदेशी  पळून जाण्याची तयारी 

खरात मोठे प्रस्थ असल्याने ही माहिती अहिल्यानगरच्या पोलिस अधीक्षकांनी महासंचालकांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविली. फडणवीस यांनी बारकाईने तपास करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, निरज गायब असल्याने आपले बिंग फुटणार ही खरातला भीती होती. 

खरात ऑस्ट्रेलियात पलायन करणार, अशी माहितीही पोलिसांना मिळाली होती. म्हणून शिर्डी येथील १८ फेब्रुवारीच्या गुन्ह्यात खरातला  ९ मार्च रोजी आरोपी करण्यात आले. त्याआधारे त्याला १० मार्चला लुकआउट नोटीस निघाल्याने खरातची परदेशात उडाण घेण्याची चाल उधळली गेली. त्याच्या घरीही पोलिसांनी पाळतठेवली होती. 

विदेशातही मालमत्ता, तब्बल १५० परदेश दौरे   

खरात याची नाशिक, अहिल्यानगरसह अन्य अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. याशिवाय विदेशातही त्याची मालमत्ता असल्याचे सांगितले जात आहे. स्वतःला ‘गुरू’ म्हणवून घेणारा खरात विदेशात मात्र लक्झरीयस लाइफ उपभोगत असल्याचे पुढे येत आहे. 

दक्षिण कोरियातील त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यात तो आपल्या कुटुंबासोबत मौजमजा करताना दिसत आहे. त्याने तब्बल १५० परदेश दौरे केल्याचेही आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याचा पासपोर्ट, ट्रॅव्हल हिस्ट्री आणि खर्चाची चौकशी होणार आहे.

मुंबईच्या कोणत्या अधिकाऱ्याकडून पुरवली जाते रसद?

अशोक खरातला अटक झाल्यानंतर त्याला पैसे आणि वकिलासह अन्य मदत मुंबईतील एक उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी पुरवत आहे, असा आराेप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. त्यामुळे आता हा उपजिल्हाधिकारी कोण? याविषयी उत्सुकता आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Guru Kharat prevented from fleeing to Australia; police investigation.

Web Summary : Police stopped fake guru Kharat from fleeing to Australia. He allegedly exploited women, blackmailed influential people, and arranged illicit relationships. A young woman's complaint led to his exposure, with police secretly investigating and preventing his escape.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAhilyanagarअहिल्यानगरNashikनाशिक