शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी हत्याकांडाला नेत्यांकडून जातीय वळण

By admin | Updated: October 28, 2014 01:00 IST

पाथर्डी : जवखेडे खालसा या साडेपाचशे कुटुंब संख्या असलेल्या गावात १९ जाती-जमातीचे नागरिक वर्षानुवर्षे एकत्र नांदत होते़ गावात कधीही तंटा होत नसल्यामुळे राज्य सरकारनेही

पाथर्डी : जवखेडे खालसा या साडेपाचशे कुटुंब संख्या असलेल्या गावात १९ जाती-जमातीचे नागरिक वर्षानुवर्षे एकत्र नांदत होते़ गावात कधीही तंटा होत नसल्यामुळे राज्य सरकारनेही या गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार देऊन गौरविले़ मात्र, गावातीलच जाधव कुटुंबियांच्या तिहेरी हत्याकांडामुळे गाव बदनाम झाले असून, बाहेरुन येणारे नेते या हत्याकांडाला जातीय रंग देत आहेत़ त्यामुळे गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याची खंत जवखेडे खालसा ग्रामसभेत व्यक्त करण्यात आली़चार हजार लोकसंख्या असलेल्या या गावात तब्बल १९ जाती-जमातीचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते़ मात्र, मागील आठवड्यात गावातील दलित कुटुंबातील तीघांची निघृणपणे हत्या झाली़ या हत्येनंतर गावावर जातीय हत्याकांडाचा कलंक लागला़ सोमवारी तहसिलदार सुभाष भाटे यांच्या उपस्थितीत ग्रामसभा झाली़ सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते तथा वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक उध्ववराव वाघ होते. या ग्रामसभेत विविध वक्त्यांनी गावाच्या दृष्टीने ही घटना निंदणीय असल्याचे सांगितले़ गावामध्ये कधीही भांडण तंटा नाही़ दोन वर्षापूर्वी गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार मिळाला़ कधीही जातीजातीत वाद झालेले नाही़ घटना घडल्यापासून ते अंत्यविधीपर्यंत गावातील प्रत्येक माणूस त्या ठिकाणी उपस्थीत होता. गावात मुस्लीम समाज तीस ते पस्तीस टक्के आहे़ सर्व धर्माचे गुण्या गोविंदाने रहातात़ परंतु बाहेरचे नेते त्यांची दुकानदारी चालावी यासाठी गावात येवून गाव पेटवून देवू अशी घमकी देत आहेत़ वेगवेगळे आरोप करीत आहेत़ यामुळे गावकरी व्यथीत झालेले आहेत़ यातून गावात जातीय तणाव वाढू नये, यासाठी प्रशासनाने संबधीत नेत्यांना याची कल्पना देणे गरजेचे आहे. तपासकार्यात गावकरी पोलिसांना मदत करीत आहेत़ परंतु जे निरपराध आहेत त्यांना थर्ड डिग्री लावू नका, तपास लवकरात लवकर लागावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे़ परंतु बाहेरची मंडळी गावात येवून गावाला बदनाम करीत आहेत, याचे दु:ख व्यक्त करीत गावात सलोखा राखण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली़ ग्रामसभेच्या ठरावाचे निवेदन ग्रामस्थांनी तहसिलदार सुभाष भाटे यांना दिले. यावेळी अ‍ॅड. वैभव आंधळे, चारूदत्त वाघ, सुरेश वाघ, अमोल वाघ, इसाक भाई शेख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)