अतिक्रमण हटाओ मोहीमेस संगमनेरात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 11:52 IST2018-12-18T11:52:44+5:302018-12-18T11:52:49+5:30

संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्राजीत नायर यांच्या नेतृत्वाखाली अखेर आज संगमनेरात अतिक्रमण हटाओ मोहीमेला सुरुवात झाली.

The encroachment begins in the confluence of the campaign | अतिक्रमण हटाओ मोहीमेस संगमनेरात सुरुवात

अतिक्रमण हटाओ मोहीमेस संगमनेरात सुरुवात

संगमनेर : संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्राजीत नायर यांच्या नेतृत्वाखाली अखेर आज संगमनेरात अतिक्रमण हटाओ मोहीमेला सुरुवात झाली.सकाळी साडेनऊ वाजल्यापासून नेहरु चौकातून या मोहीमेला सुरुवात करतांना पालिकेने बांधकामे जमीनदोस्त करत अतिक्रमणांचा कोंडाळा मुक्त केला.
दोन जेसीबी यंत्र, चार ट्रॅक्टर, पालिकेचे दोनशेहून अधिक अधिकारी, कर्मचारी व कामगार तसेच मोठ्या पोलीस बंदोबस्तासह नेहरु चौकातील सर्व अतिक्रमणे हटविण्यात आली. यावेळी अतिक्रमणधारकांशी किरकोळ शाब्दीक बाचाबाची वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नेहरु चौकानंतर ही मोहीम सय्यदबाबा चौक, मेनरोड या परिसरात राबविली जाणार आहे. मोहीमेदरम्यान बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने त्यांना हटविण्यासाठी पोलिसांना परिश्रम करावे लागत आहेत.

Web Title: The encroachment begins in the confluence of the campaign