पालिकेतून विठ्ठल चिमाजी ताठे, अनिल दादा कर्डक, सुमन वसंत बर्वे, सुमन भाऊसाहेब महांकाळे हे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. यावेळी नगराध्यक्षा पिपाडा व मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते त्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. पालिका व या शहराच्या प्रती आपली काही जबाबदारी आहे, या भावनेतून प्रत्येकाने काम केले पाहिजे, असे पिपाडा म्हणाल्या. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उत्तम आरोग्यच्या शुभेच्छा दिल्या. चारही कर्मचाऱ्यांना एक वर्षाचा आरोग्य विमा स्वखर्चातून उतरवून देण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले. यावेळी डॉ.राजेंद्र पिपाडा, गटनेते विजय सदाफळ, सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे, रवींद्र बोठे, अनिल कुंभकर्ण यांनीही मनोगत व्यक्त केले.
----
फोटो -०३ राहाता
ओळी : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना नगराध्यक्षा ममता पिपाडा व राजेंद्र पिपाडा.