शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर दिले
3
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
4
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
5
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
7
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
8
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
9
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
10
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
11
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
12
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
13
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
14
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
15
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
16
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
17
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
18
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
19
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
20
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पंचवीस लाखांचा अपहार, माजी सरपंचाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST

घारगाव (जि. अहमदनगर) : ग्रामसेवकाच्या मदतीने २५ लाख २१ हजार ९११ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सारोळे पठार येथील तत्कालिन सरपंच ...

घारगाव (जि. अहमदनगर) : ग्रामसेवकाच्या मदतीने २५ लाख २१ हजार ९११ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सारोळे पठार येथील तत्कालिन सरपंच व ग्रामसेवक यांच्याविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. यातील दोन्ही आरोपी फरार होते. रविवारी (दि. ११) रात्री पोलिसांनी सारोळे पठार येथून माजी सरपंचाला अटक केली तर ग्रामसेवक अद्याप फरार आहे.

प्रशांत गवराम फटांगरे असे अटक केलेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गुन्हा दाखल असलेला तत्कालिन ग्रामसेवक सुनील शेळके हा पसार आहे. माजी सरपंच फटांगरे आणि तत्कालीन ग्रामसेवक शेळके या दोघांनी २०१४-१५ तेे २०१७-१८ या कालावधीत शासकीय निधीतून कामे न करता २५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. अमित बादशहा फटांगरे यांनी ग्रामपंचायत निधीत अपहार झाल्याची तक्रार केली होती. तक्रारीची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची तीन सदस्यीय समिती गठीत केली होती. या समितीने आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता केल्याचा अहवाल दिला होता. या अहवालावर माजी सरपंच फटांगरे याचे म्हणणे मागितले असता त्याने काही म्हणणे सादर केले नव्हते.

कामाचे अंदाजपत्रक घेणे, मूल्यांकन करणे, कामांना ग्रामपंचायत सभेची मान्यता घेणे, या बाबींची पूर्तता न करता माजी सरपंच फटांगरे याने ११ लाख ७२ हजार रुपये स्वत:च्या नावाने धनादेश काढले. तसेच संयुक्त जबाबदारी असलेल्या खात्यातून काढलेल्या ५० टक्के रकमेलाही त्यांना जबाबदार धरण्यात आले होते. अशा प्रकारे माजी सरपंचाने १६ लाख १३ हजार, तर ग्रामसेवकाने ९ लाख ८ हजार असा एकूण २५ लाख २१ हजार रुपयांचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एकूण ८२ वेळा माजी सरपंचाने स्वत:च्या नावाने पैसे काढल्याचे चौकशीत समोर आले होते. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत, पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे, गणेश तळपाडे यांनी माजी सरपंच फटांगरे याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली.