जेऊर येथे आठवीतील विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 15:33 IST2020-07-10T15:32:26+5:302020-07-10T15:33:37+5:30
नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथे गुरुवारी (दि.९ जुलै) सायंकाळी इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. निलेश संतोष आवारे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

जेऊर येथे आठवीतील विद्यार्थ्याची आत्महत्या
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथे गुरुवारी (दि.९ जुलै) सायंकाळी इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. निलेश संतोष आवारे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
नगर तालुक्यातील इमामपूर येथील निलेश संतोष आवारे (वय १३) हा विद्यार्थी जेऊर येथे आपल्या मामाकडे राहत होता. त्याने गुरुवारी सायंकाळी घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येचे कारण समजले नाही. सदर घटनेचा एम.आय.डी.सी. पोलिसांनी पंचनामा केला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.