शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक ग्रामपंचायतीला देणार धूर फवारणी यंत्र

By admin | Updated: November 18, 2014 15:04 IST

औषधांचा साठा ते वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून रुग्णांना मिळणारी वागणूक यांच्या नोंदी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी दिली.

 अहमदनगर : जिल्हा परिषद सदस्य, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्राची तपासणी करण्यात येणार आहे. औषधांचा साठा ते वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून रुग्णांना मिळणारी वागणूक यांच्या नोंदी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी दिली.आरोग्य समितीच्या मासिक सभेनंतर उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती शेलार बोलत होते. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.बी. गंडाळ उपस्थित होते. सुरूवातीला जिल्ह्यातील डेंग्यूच्या साथीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात १३६ जणांना डेंग्यूची लागण झाली असून त्यातून १३ रुग्ण दगावलेले आहेत. यामुळे ग्रामीण भागात दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्र आणि उपकें द्राची तपासणी करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. यात त्या ठिकाणी असणारी दैनंदिन बाह्य रुग्णांची संख्या, होणार्‍या शस्त्रक्रिया, लाभार्थ्यांना शस्त्रक्रियेचे मानधन मिळते की नाही. त्या ठिकाणी आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून रुग्णांना कशा प्रकारे वागणूक मिळते, याची खातरजमा जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यावेळी प्रत्येक सदस्यांना त्यांचा तालुका बदलून तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. रुग्णांना त्यांच्या तक्रारी देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकारी यांचे मोबाईल नंबर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींतर्गंत जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून दोन धूर फवारणी यंत्र खरेदी करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची तपासणी सक्तीची करण्यात आलेली आहे. पाणी नमुने तपासणीत हयगय करणार्‍या कर्मचारी आणि ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले. ज्या ग्रामपंचायती हागणदारीमुक्तीच्या योजनेत सहभागी होऊन काम करणार नाहीत. त्यांच्या विकास निधीला कात्री लावण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.सभेला सदस्या स्वाती कानडे, अश्‍विनी भालदंड, भास्कर खर्डे, चित्रा बर्डे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे हे सदस्य उपस्थित होते. ■ जिल्ह्यात डेंग्यूची साथ असल्याने सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी यांच्या रजा रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच ते मुख्यालयात राहतात की नाही, याची माहिती घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.