५९ गावांत उडणार ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST2020-12-13T04:34:58+5:302020-12-13T04:34:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क श्रीगोंदा : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. गावात आपले ...

५९ गावांत उडणार ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. गावात आपले सत्ता वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध पक्षांचे गाव कारभारी पूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे गुलाबी थंडीत निवडणूक प्रचाराचा धुराळा उडणार आहे.
तालुक्याच्या राजकारणात आमदार बबनराव पाचपुते, कुकडी कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप नागवडे, साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार, बाबासाहेब भोस यांचे गावोगाव गट आहेत. तालुक्याची राजकीय नाडी आ. बबनराव पाचपुते यांच्या ताब्यात आहे. मात्र, महविकास आघाडीचा तगडा विरोध आहे; पण या निवडणुकीत गावपातळीवर स्थानिक आघाड्या होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील नेत्यांना वेगळा शाॅक बसणार आहे. ५९ ग्रामपंचायतींपैकी आढळगाव, येळपणे, घोडेगाव, राजापूर, टाकळी कडेवळीत, म्हातारपिंप्री येथील निवडणूक गाजणार हे निश्चित आहे.
...
या ग्रामपंचायतींची होणार निवडणूक
अजनुज, आर्वी-अनगारे, आढळगाव, उकडगाव, उख्खलगाव, एरंडोली, कामठी, कोथूळ, कोंडेगव्हाण, कोसगव्हाण, कोरेगाव, कोरेगव्हाण, कौठा, खांडगाव, गव्हाणेवाडी, गार, घुगल वडगाव, घोडेगाव घोटवी, चांडगाव, चांभुर्डी, चिखली, चिखलठाणवाडी, चिंभळा, चोराचीवाडी, टाकळी कडेवळीत, ढवळगाव, ढोरजा, देऊळगाव, निंबवी, निमगाव खलू, पिंप्री कोलंदर, पिसोरे खांड, बाबुर्डी, बांगर्डे, बेलवंडी कोठार, बोरी, भानगाव, म्हातारपिंपरी, म्हसे, मुंगूसगाव, येवती, येळपणे, राजापू रायगव्हाण, रुईखेल, वडाळी, लिंपणगाव, वांगदरी, वेळू, शिरसगाव बोडखा, शेडगाव, सांगवी दुमाला, सारोळा सोमवंशी, सुरेगाव, सुरोडी, हंगेवाडी, हिंगणी दुमाला, हिरडगाव.