दुष्काळाची स्थिती चिंताजनक

By Admin | Updated: November 20, 2014 14:17 IST2014-11-20T14:17:26+5:302014-11-20T14:17:26+5:30

जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील खरीप वाया गेले, तर दुसरीकडे ७५0 गावांवर पाणी संकट कोसळणार आहे.

Drought conditions are worrisome | दुष्काळाची स्थिती चिंताजनक

दुष्काळाची स्थिती चिंताजनक

जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील खरीप वाया गेले, तर दुसरीकडे ७५0 गावांवर पाणी संकट कोसळणार आहे. काही तालुक्यातील फळ पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले असून,शेतकर्‍यांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.

जिल्ह्यात कमी पाऊस पडला. कमी पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला. केलेला खर्चही निघाला नाही. जिल्ह्यातील १४ तालुक्यांत १ हजार ५९९ गावे आहेत. खरिपाची पिके घेणार्‍या गावांची संख्या ५८१ तर रब्बीची १ हजार १८ गावे आहेत. रब्बीची पिके सध्या उभी आहेत. नुकत्याच झालेल्या आवकाळी पावसाने रब्बीच्या पिकांना काहिसा दिलासा मिळाला. परंतु पाण्याअभावी खरिपाची पिके वाया गेली. खरिपाच्या सुधारित आणेवारीनुसार पन्नासपैसेपेक्षा कमी आणेवारी असणार्‍या गावांची संख्या ३0५ झाली आहे. या गावातील शेतकरी पिके वाया गेल्याने आर्थिक अडचणीत सापडला आहे. पीक गेले आणि पिण्याच्या पाण्यासाठीही त्यांच्यावर वणवण करण्याची वेळ येणार आहे. त्यांना आता एकमेव रब्बी पिकांची आशा आहे. या पिकांना जीवदान देण्यासाठी शक्य तिथे जलाशयातून आवर्तन सोडण्यात आले होते. परंतु अवकाळी पाऊस झाल्याने आवर्तन बंद करण्यात आले आहे. प्रशासनाने हात आखडता घेतल्याने रब्बीची पिके धोक्यात आली आहेत. अवकाळी पावसाने हजेरी लावली. पण पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट कायम आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टंचाई कृती आराखडा तयार केला जात आहे. जिल्ह्यातील १ हजार ५९९ गावांपैकी डिसेंबरपर्यंत २0२ गावांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. तर ८७0 वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागेल. पहिल्या टप्प्यात टँकरसाठीचा खर्च ५ कोटी १३ लाखांच्या घरात जाणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येत्या जूनपर्यंत सुमारे ६५0 गावे आणि २ हजार ३0२ वाड्या टँकरवर अवलंबून असणार आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनवारांच्या चार्‍याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यात काही दीर्घकालीन योजनादेखील प्रशासनाकडून राबविल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)
 
पारनेर३१ पंचनामाच्या सूचना
■ नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेती पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून कृषी विभागासह तहसीलदार आणि तलाठय़ांना करण्यात आल्या आहेत. डिसेंबरपर्यंत
■ गावे- २0२, वाड्या- ८७0
जानेवारी ते मार्च
■ गावे-४९७, वाड्या- १,७३0 
एप्रिल ते जून
■ गावे- ७५0, वाड्या- २,३0२ अहमदनगर: जिल्ह्यातील १५ हजार ५९९ गावांपैकी खरीप पिकाची पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणारी तब्बल ३0५ गावे आहेत. 
 

Web Title: Drought conditions are worrisome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.